शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

झाडे तोडणार, पुराचा धोका वाढणार; स्वच्छ पाणी सोडा, मगच नदीकाठ सुधार हाती घ्या-नीलम गोऱ्हे

By श्रीकिशन काळे | Updated: May 8, 2023 14:50 IST

पुणे महापालिकेच्या ‘आरएफडी’ (रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट) प्रकल्पाविषयी अनेक त्रुटी असल्याने नदीचे नुकसान होणार

पुणे : पुणे महापालिकेच्या ‘आरएफडी’ (रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट) प्रकल्पाविषयी अनेक त्रुटी आहेत. त्यातून नदीचे नुकसान होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे परीक्षण ‘नीरी’ या संस्थेकडून करून घ्यावे, या प्रकल्पामुळे नदीचे डोहात रूपांतर होईल, नदीपात्र अरूंद होत असल्याने पुराचा धोका वाढणार आहे, या गोष्टींबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या आहेत.

नदीकाठ पुनरूज्जीवन प्रकल्पाबाबत डॉ. गोऱ्हे यांना यापूर्वी नदीप्रेमींनी माहिती दिली होती. त्यानंतर डॉ. गोऱ्हे यांनी प्रधान सचिव, महापालिका आयुक्त, नगर विकास विभाग सचिव यांना पत्र पाठवून कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत. तसेच काय कार्यवाही केली, ते कळवावे, असेही पत्रात नमूद आहे. पुणे शहराच्या विविध भागातून नदीत येणारे मैलापाणी प्रक्रिया करून चांगले पाणी नदीपात्रात सोडा व नंतरच नदीकाठ सुधार हाती घ्यावे. नदीकाठ सुधार अंतर्गत नदी पात्रातील पूल पाडण्यात येणार असून, रस्तेही बंद करण्यात येणार आहेत. यावर उपाय काढण्याची आवश्यकता आहे. हजारो झाडेही तोडली जाणार आहेत. ते तत्काळ थांबवावे व तशा सचूना द्याव्यात, असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले आहे.

कोणतीही वृक्षतोड करू नये नीरी सारख्या संस्थेकडून प्रकल्पाचे संभाव्य पर्यावरण आघात परीक्षण करून घ्यावे. पर्यावरण विषयक काम करणाऱ्या संस्थांची मते विचारात घ्यावीत. त्यांना बैठकांना बोलवावे. महापालिकेने नागरिकांची, संस्थांच्या कार्यकर्त्यांचे मत जाणून घेण्यासाठी बैठक घ्यावी. याविषयी जनसुनावणी घेऊन मगच प्रकल्पाला सुरवात करावी. तोपर्यंत कोणतीही वृक्षतोड करू नये, असे निर्देश डॉ. गोऱ्हे यांनी दिले आहेत.

टॅग्स :Puneपुणेmula muthaमुळा मुठाNeelam gorheनीलम गो-हेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाenvironmentपर्यावरण