शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

आकाश मिसाईलच्या सेक्शनचे हस्तांतर, वालचंदनगर कंपनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 02:31 IST

वालचंदनगर कंपनीने यशस्वीरीत्या तयार केलेल्या सहाशेव्या आकाश मिसाईलच्या सेक्शनचे हस्तांतर भारत सरकारच्या भारत डायनॅमिक्स लिमिटेड कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक व्ही. उदय भास्कर व वालचंदनगर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक जी. के. पिल्लई यांच्या हस्ते करण्यात आले.

वालचंदनगर : वालचंदनगर कंपनीने यशस्वीरीत्या तयार केलेल्या सहाशेव्या आकाश मिसाईलच्या सेक्शनचे हस्तांतर भारत सरकारच्या भारत डायनॅमिक्स लिमिटेड कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक व्ही. उदय भास्कर व वालचंदनगर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक जी. के. पिल्लई यांच्या हस्ते करण्यात आले.येथील वालचंदनगर इंडस्ट्रीज लि. या कंपनीचा स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशउभारणी व देशप्रगतीच्या कामामध्ये मोलाचा सहभाग आहे. २०११ पासून आकाश मिसाईलच्या सेक्शनच्या निर्मितीस वालचंदनगर कंपनीमध्ये सुरुवात झाली. कंपनीमध्ये ३१ वर्षे मिसाईलच्या सेक्शनवर संशोधन सुरू होते. कंपनीने नुकतेच ६०० व्या मिसाईल सेक्शनची यशस्वी निर्मिती केली आहे. भास्कर यांनी काल (गुरुवारी) कंपनीला भेट दिली.भास्कर यांनी सांगितले, की आपला भारत देश मिसाईल क्षेत्रामध्ये स्वयंपूर्ण होत आहे. लवकरच जगातील इतर देशांना भारत मिसाईल निर्यात करू शकेल. आपल्या देशाच्या सुरक्षिततेसाठी मिसाईलनिर्मिती केली जात आहे. मिसाईलनिर्मिती करीत असताना क्वालिटीला फार महत्त्व आहे. मिसाईलच्या निर्मितीमध्ये झालेल्या छोट्याशा चुकीमुळेसुद्धा मिसाईल झेप घेऊ शकत नाही. वालचंदनगर कंपनी तयार करीत असलेल्या मिसाईलच्या मोटर्स या मिसाईलच्या हात म्हणून कार्य करीत असतात. मिसाईलचे योग्य लक्ष गाठण्यासाठी याचा उपयोग होतो. कंपनीतील कर्मचारी मिसाईलचे दर्जेदार सेक्शन तयार करीत असून देशाला मिसाईल क्षेत्रामध्ये स्वयंपूर्ण करण्यामध्ये वालचंदनगर कंपनीचा मोलाचा सहभाग आहे.आज महिन्याला २० मिसाईल सेक्शन तयार होत असून यामध्ये वाढ करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले.या वेळी भास्कर व पिल्लई यांच्या हस्ते ६०० व्या मिसाईलचे सेक्शनच्या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले. या वेळी आकाशामध्ये फुगे सोडून आनंद व्यक्त करण्यात आला.या वेळी वालचंदनगर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक जी. के. पिल्लई यांनी सांगितले, की वालचंदनगर कंपनीने आजपर्यंत ६०० यशस्वी आकाश मिसाईलनिर्मितीसाठी मोलाची मदत केली. यापुढे कंपनीने मिसाईलनिर्मिती क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करण्याचे नियोजन केले आहे. सहा वर्षांपूर्वी महिन्यामध्ये एखादे-दुसरे मिसाईलचे सेक्शन तयार होत होते.

टॅग्स :Puneपुणे