शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेतील सत्ता राखण्याचं आव्हान; पुण्यात भाजप नगरसेवकांच्या प्रशिक्षणाला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 18:22 IST

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये दोन दिवसांचं प्रशिक्षण शिबीर

पुण्यातले भाजपचे नगरसेवक निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. आजपासून नगरसेवकांचे दोन दिवसांचे प्रशिक्षण रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये सुरु झाले आहे. यामध्ये नगरसेवकांना संघाच्या शिस्तीपासून ते अर्थसंकल्पापर्यंत अनेक बाबतीत प्रशिक्षण दिलं जाणार आहे.  पुणे महापालिकेच्या निवडणुकीला आता एक वर्ष शिल्लक राहिले आहे. गेल्यावेळी भाजपने निवडणुकीत जवळपास सेंच्युरी मारत एकहाती सत्ता मिळवली होती. गेल्या वर्षी अनेक महत्वकांक्षी प्रकल्प मार्गी लावण्याची तयारी भाजप नगरसेवकांनी केली असली तरी कोरोनामुळे या सगळ्या प्रकल्पांसाठी यंदा तरतूद आणि पाठपुरावा करण्याची वेळ भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांवर आली आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप नेते यंदा लवकरच निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.प्रदेशाध्यक्षच पुण्यात असल्याने यंदा गेल्या निवडणुकांच्या तोडीस तोड कामगिरी करण्याची तयारी भाजपकडून करण्यात येत आहे. यापूर्वी पुण्यात काही कार्यक्रम घेतले गेले तरी आजच्या प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून निवडणुकीच्या तयारीला अधिकृतरित्या सुरुवात झाली आहे.  आज दुपारी साडेतीन वाजता भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या शिबिराचे उद्धाटन झाले. त्यांनी पक्षाची धोरणं आणि पुढची दिशा याबाबत नगरसेवकांना मार्गदर्शन केलं. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ-आणि भाजप याबाबत नगरसेवकांना मार्गदर्शन करण्यात आले. तर तिसऱ्या सत्रात अर्थसंकल्पाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विशेष म्हणजे दोन दिवसांच्या या शिबिरासाठी पुण्यातुन सगळे नगरसेवक बसवे एकत्र रवाना झाले. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सेल्फी देखील पोस्ट केला. गेल्या काही दिवसांपासून भाजपचे काही नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे एकत्र प्रवास करत आणि फोटो टाकत हम सब एक है चा संदेश  भाजप कडुन देण्याच्या प्रयत्न केला जातोय का अशी चर्चा सध्या रंगली आहे.

टॅग्स :BJPभाजपा