शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाच्या गोडीसाठी साकारली आगगाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 00:32 IST

कामशेत : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचा उपक्रम

चंद्रकांत लोळे कामशेत : येथील पंचशील कॉलनीमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील वर्ग खोल्यांना रंगरंगोटी करून लहान मुलांची आवडती आगगाडी साकार करण्यात आली आहे. शिवाय या आगगाडीवर विविध सामाजिक संदेश रेखाटल्याने विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात आगगाडीत बसून शिक्षण घेण्याचा आभास होत आहे. तर स्थानिक नागरिक यांना येथे येऊन सेल्फी काढण्याचा आपला मोह पूर्ण करीत आहे.कामशेत शहरातील जुन्या मुंबई-पुणे महामार्गाच्या पलीकडे असलेल्या पंचशील कॉलनीमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नुकताच रेल्वे फालाट स्टेशनचा बोर्ड लागला असून, त्यावर शाळेचे नाव टाकण्यात आले आहे. या शाळेतील चार वर्गखोल्यांवर रंगरंगोटीच्या माध्यमातून अगदी हुबेहूब चिमुकल्यांची आगगाडी नुकतीच साकारण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह आजूबाजूच्या नागरिकांचा औत्सुक्याचा विषय बनला आहे. या आगगाडीमुळे विद्यार्थ्यांच्या गैरहजेरीचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे उत्साहाचे वातावरण आहे.शिक्षकांचा मराठीचा आग्रहया प्राथमिक शाळेत चार वर्गखोल्या असून, यात १ ली ते ४ थी पर्यंतचे शिक्षण होत आहे. या शाळेची एकूण पटसंख्या ७९ आहे. यात ४० मुले आणि ३९ मुली शिक्षण घेत आहेत. त्यांना शिक्षणाचे धडे देण्यासाठी तीन शिक्षक असून, पालकांचा ओढा मराठी शाळांकडे होण्यासाठी ते कायम कार्यरत आहेत.विविध संघटनांची आर्थिक मदतशाळेच्या वर्गखोल्यांवर आगगाडी साकारण्यासाठी मॅजिक बस, मोंडेलिझ शुभारंभ या संस्थांनी आर्थिक मदत केली असून, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन पंढरीनाथ कांबळे, उपाध्यक्ष सारिका यशवंत सोनवणे, सुनील नागजी माळी आदी व मुख्याध्यापक सुरेश आनंदा कांबळे, उपशिक्षक अनिल तुकाराम गाडे, गौतम ज्ञानेश्वर जुगदार, केंद्र प्रमुख नीलिमा संजय कुलकर्णी आदींनी विशेष परिश्रम घेतले आहेत.

टॅग्स :Educationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रPuneपुणे