शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेगाड्यांचे झटके कमी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 01:56 IST

जुन्या बांधणीच्या रेल्वे डब्यांना गाडी सुरू होताना व थांबताना बसणारे झटके आता थांबले आहेत.

पुणे : जुन्या बांधणीच्या रेल्वे डब्यांना गाडी सुरू होताना व थांबताना बसणारे झटके आता थांबले आहेत. मध्य रेल्वेच्यापुणे विभागाने त्यासाठी नवीन उपकरण विकसित केले असून, त्याचा वापर संबंधित गाड्यांमध्ये सुरू करण्यात आला आहे.लिंक हॉफमन बुश (एलएचबी) बांधणीच्या डब्यांबाबत प्रवाशांची नेहमीच तक्रार असायची. गाडी सुरू होताना तसेच ब्रेक लावल्यानंतर डब्यांना झटके बसत होते. त्यामुळे त्याचा प्रवाशांना त्रास व्हायचा. याबाबत प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने तक्रारी केल्या जात होत्या. त्यावर मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने पहिल्यांदा उपाय काढला आहे. दोन डब्यांना जोडण्यासाठी ‘सेंटर बफर कपलर सिस्टीम (सीबीसी)’ वापरली जात होती. त्यातील ड्राफ्ट गिअरमध्ये काही बदल करून रेल्वे डिझाईन अ‍ॅन्ड रिसर्च आॅर्गनायझेशन (आरडीएसओ) ने नव्या रचनेचे ‘बॅलेन्स्ड टाईप ड्राफ्ट गियर’ हे उपकरण विकसित केले आहे. मध्य रेल्वेत पहिल्यांदा पुणे विभागात या उपकरणाचा वापर सुरू केल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.पुण्यातून सुटणारी सिकंदराबाद शताब्दी, अहमदाबाद दुरांतो तसेच मुबंई इंटरसिटी गाड्यांमधील दोन डब्यांना या नवीन उपकरणाद्वारे जोडण्यात आले आहे. यामुळे गाडी सुरू झाल्यानंतर तसेच थांबताना कोणत्याही प्रकारचे झटके जाणवत नाहीत, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :railwayरेल्वेPuneपुणे