शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

खंडाळा बोरघाटातील क्रेन बाजूला करण्यात यश, एक्स्प्रेस वेवरची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2017 22:02 IST

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खंडाळा बोेरघाट चढताना बोरघाट पोलीस चौकी ते अमृतांजन पुलादरम्यान एका ट्रेलरची जिपला धडक बसून ट्रेलर रस्त्यात फिरल्याने पुण्याच्या दिशेने येणारी वाहतूक ठप्प झालीय.

लोणावळा : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खंडाळा बोरघाटातील अमृतांजन पुलाजवळ सायंकाळी सात वाजता अपघातग्रस्त होऊन रस्त्यात फिरलेली अवजड क्रेन (पुलर) मार्गावरून बाजुला करण्यात नऊ वाजण्याच्या सुमारास पोलीस यंत्रणेला यश आले अाहे. मात्र अपघातानंतर वाहतूक ठप्प झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने विस्कळीत झालेली वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे.      खंडाळा बोरघाट चढत असताना अवजड क्रेनचा एक्सल तुटल्याने सदर क्रेन ही मागे सरकत आली. यावेळी मागे असलेली होंडा सिटी कार क्रेनच्या खाली अडकल्याने हा अपघात झाला. अपघातात कारमधील तीन जण गाडीत अडकले होते. बोरघाट पोलीस, देवदूत पथक व अपघातग्रस्तांच्या मदतीला या ग्रुपच्या सदस्यांनी जखमींना गाडीतून बाहेर काढले. त्यानंतर बोरघाट पोलीस व आयआरबीच्या पथकाने अवजड क्रेन दोन तासांच्या प्रयत्नानंतर बाजूला केली.नऊ वाजता वाहतूक सुरू झाली असून, तासाभरात वाहतूक पूर्वपदावर येईल असे पोलीस सूत्रांनी सांगितले.  मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खंडाळा बोेरघाट चढताना बोरघाट पोलीस चौकी ते अमृतांजन पुलादरम्यान एका ट्रेलरची जिपला धडक बसून ट्रेलर रस्त्यात फिरल्याने पुण्याच्या दिशेने येणारी वाहतूक ठप्प झाली होती. अपघातानंतर पुण्याच्या दिशेने येणारी वाहने छेद रस्त्यावरून मुंबई मार्गिकेने वळविण्यात आल्याने मुंबईकडे जाणार्‍या वाहनांच्या देखील रांगा लागल्या होत्या. बोरघाट चौकीलगतच हा अपघात झाला आल्याने मदत यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्यानं ट्रेलर बाजूला करण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले. मात्र वाहतूक पूर्ण ठप्प झाल्याने पुण्याकडे येणार्‍या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.