शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

सेनापती बापट रस्त्याची वाहतूक कोंडी अखेर फुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 13:42 IST

सेनापती बापट रस्त्यावर गेल्या काही वर्षांत शैक्षणिक संस्था, हॉटेलस्, कार्पोरेट आॅफिसेसची संख्या वाढली. यामुळे वाहतूक कोंडीमध्ये अधिकच भर पडला आहे.

ठळक मुद्देपाषाण-पंचवटी ते कोथरुड बोगदा : सल्लागार नियुक्ती

पुणे:  गेल्या अनेक वर्षांपासून केवळ चर्चा असलेला ‘पाषाण -पंचवटी ते कोथरुड असा बोगदा तयार करण्यास अखेर सल्लागार नेमण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. यामुळे सेनापती बापट रस्त्यावरील वाहूतक कोंडी फुटण्यास मदत होणार आहे. या सल्लागाराकडून लवकरच याबाबतचा प्रकल्प आराखडा तयार करण्यात येणार आहे.सेनापती बापट रस्त्यावर गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणत वाहूतक कोंडी वाढली आहे. या रस्त्यावर असलेल्या शैक्षणिक संस्था, हॉटेलस्, कार्पोरेट आॅफीसेसची संख्या वाढली. यामुळे वाहतूक कोंडीमध्ये अधिकच भर पडला आहे. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेच्या सन २०१७-१८ च्या अंदाजपत्रकात या कामासाठी सुमारे एक कोटी रुपयांची  तरतूद करण्यात आली होती. या बोगद्यामुळे या दोन्ही रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी होणार असून शहराच्या पूर्व पश्चिमेकडील जोडणारा नवीन मार्गही तयार होणार आहे. पाषाण तसेच औंध, पंचवटी, बोपोडी या भागातून नागरिकांना कोथरूड तसेच वारजेकडे जाण्यासाठी सध्या सेनापती बापट रस्त्याचा वापर करावा लागतो. तर कोथरूडकडून बालेवाडी-बाणेरकडे जाणारी बहुतांश वाहतूक मुंबई-पुणे महामार्गावरून होत असली, तरी हा रस्ता लहान वाहनांसाठी धोकादायक आहे. त्यामुळे सेनापती बापट रस्त्याचा वापर केला जातो. तसेच शहराच्या पूर्व आणि दक्षिण उपनगरांमधून आलेल्या वाहनांना पश्चिमेकडे जाण्यासाठी याच रस्त्यांचा वापर करावा लागतो. परिणामी, या दोन्ही रस्त्यांवर दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन पाषाण- पंचवटी ते कोथरूड असा बोगदा करण्याचे काम महापालिकेच्या विकास आराखड्यात प्रस्तावित होते. त्यास शासनाने मान्यता दिल्याने २०१७-१८ च्या अंदाजपत्रकात या कामासाठी स्वतंत्र तरतूदही करण्यात आलेली आहे. या प्रकल्पाचा फिजिबिलीटी अहवाल, नकाशे वाहतूक नियोजन आराखडा, वाहूतक विभाग व वन विभागाच्या आवश्यक मान्यता, टोपोग्राफी, सर्वेक्षण आदी सर्व गोष्टींसाठी स्वतंत्र सल्लागाराची नियुक्ती करण्याची गरज आहे. यामुळे स्थायी समितीच्या बैठकीत सल्लागार नियुक्त करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी सांगितले.---------------- बोगद्याचा निर्णय नागरिकांशी चर्चा करूनपाषाण-पंचवटी ते कोथरुड या प्रस्तावित बोगद्याला पंचवटी भागातील नागरिकांनी विरोध केला आहे. त्यामुळे महापालिकेच्या वतीने सध्या केवळ सल्लागार नियुक्ती करून प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात येणार आहे.  हा आराखडा तयार झाल्यानंतर स्थानिक नागरिकांची चर्चा करून त्यांना विश्वासात घेऊनच पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.  परंतु हा बोगदा व रस्त्यांचे काम झाल्यास नागरिकांचा सुमारे सुमारे किलोमीटर अंतराचा फेरा वाचणार असून एक नवीन पर्यायी रस्ता निर्माण होणार आहे. त्यामुळे नागरिकांशी चर्चा करूनच पुढील निर्णय घेण्यात येईल, असे योगेश मुळीक यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेSenapati Bapat Roadसेनापती बापट रोडTrafficवाहतूक कोंडी