शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

विद्यापीठ चौकातील सगळेच प्रयोग फसल्याने वाहतूक कोंडी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 21:59 IST

विद्यापीठ चौकामध्ये वाहनांची मोठी वर्दळ सुरू असते. त्यामुळे या चौकातून रस्ता ओलांडण्यासाठी मोठी कसरत करावी लागते.

ठळक मुद्देपुलाच्या उद्घाटनाच्या दिवशीच तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या उड्डाणपूलाची रचना चुकल्याची कबुलीविद्यापीठ चौकात असलेले मुख्य प्रवेशव्दार गणेशखिंड रस्त्यावरील कस्तुरबा मार्केट येथे हलविण्यात येणार

पुणे : शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत गुंतागुंतीचा मानल्या गेलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलीस विभागाकडून वेगवेगळे प्रयोग राबविण्यात आले. मात्र ते सगळेच प्रयोग फसल्याने या चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न उग्र बनत चाललेला आहे. उड्डाण  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात चौकातील वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी या चौकात मेट्रोसह तीनमजली उड्डाणपूल बांधण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. तो लवकरात लवकर प्रत्यक्षात यावा याची प्रतिक्षा परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.विद्यापीठ चौकामध्ये शिवाजी नगर, पाषाण, बाणेर, औंध, चतु:श्रृंगी मंदिर, विद्यापीठ आदी अनेक ठिकाणचे रस्ते एकत्र येऊन मिळतात. त्यामुळे या चौकात वाहनांची मोठी वर्दळ सुरू असते. या चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी २००६ मध्ये या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात आला. मात्र या पुलाच्या उद्घाटनाच्या दिवशीच तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या उड्डाणपूलाची रचना चुकल्याची कबुली दिली होती. उड्डाणपूलाच्या माध्यमातून शिवाजीनगर कडून येणारी वाहने थेट पाषाण, बाणेर, औंधला जाण्यासाठी सोय उपलब्ध करून देण्यात आली. मात्र पाषाण, बाणेर, औंधकडून येणाऱ्या वाहनांना शिवाजीनगरकडे जाण्यासाठी पूलावरून एकही मार्ग उपलब्ध करून देण्यात आला नाही. त्यामुळे या चौकातील वाहतूक कोंडी जैसे थे राहिली आहे. त्यामुळे या चौकात दररोज सकाळी आणि सायंकाळी मोठयाा प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. या कोंडीतून मार्ग काढणाऱ्या वाहनचालकांची दमछाक होते.पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिका व वाहतूक पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत बदल करून वेगवेगळे प्रयोग करून पाहिले. मात्र या बदलांमुळे कोंडी सुटण्याऐवजी आगीतून फुफाटयात पडल्यासारखी अवस्था झाल्याने ते प्रयोग गुंडाळावे लागले आहेत. विद्यापीठ चौकात पाषाण, बाणेर, औंध या भागातून येणाºया वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. दोन वर्षांपूर्वी शिवाजीनगर कडून औंध, बाणेरकडे जाणाऱ्या पुलाच्या रस्त्याचे दोन भाग करून दुहेरी वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो पूर्णपणे अपयशी ठरला. काही दिवसांपूर्वी पाषाणकडून येणाºया वाहतुकीमध्ये उड्डाणपुलाचा खांब येतो, त्याच्या दोन्ही बाजूने वाहने जातात. त्यावर उपाय म्हणून खांबाच्या एका बाजूने तात्पुरते बॅरिगेट्स लावून वाहतूक बंद करण्यात आली. मात्र या बदलामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या, त्यामुळे काही तासांतच हा बदल मागे घ्यावा लागला.

पादचाऱ्यांचा संपेना त्राससावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकाच्या परिसरामध्ये काही शाळा आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची तेथून सतत ये-जा असते. मात्र, या चौकातून रस्ता ओलांडण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. हा चौक आकाराने खूप मोठा आहे. मध्यंतरी झेब्रा क्रॉसिंगमध्ये बदल करून तुलनेने चौकातील अंतर कमी करण्याचा विचार करण्यात आला आहे. पादचाऱ्यांना सुरक्षितरीत्या चौक ओलांडण्यासाठी छोटे-छोटे आयलँड बांधण्याचा पर्यायही पुढे आला. मात्र अजूनही पादचाऱ्यांचा सोसावा लागणारा त्रास संपलेला नाही.

.......................

विद्यापीठाचे मुख्य प्रवेशव्दार हलविणारसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात असलेले मुख्य प्रवेशव्दार गणेशखिंड रस्त्यावरील कस्तुरबा मार्केट येथे हलविण्यात येणार आहे. त्यामुळे चौकातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. या चौकामध्ये होणारे भविष्यातील मेट्रो स्टेशन, तीन मजली उड्डाणपूल आदींचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या काही महिन्यांमध्ये त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Puneपुणेuniversityविद्यापीठTrafficवाहतूक कोंडी