शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

ई-चलनद्वारे वाहतूक पोलिसांना गंडा घालणारा पोलीसच सापडला जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2017 20:34 IST

पुणे : ई-चलनद्वारे वाहतूक पोलीस पाठवत असलेल्या मेसेजसारखेच बनावट मेसेज तयार करून दंड भरला असल्याचे भासवत  पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून शासनासह वाहतूक विभागाला गंडा घालणारा पोलिसांच्या जाळ्यात सापडला.

पुणे : ई-चलनद्वारे वाहतूक पोलीस पाठवत असलेल्या मेसेजसारखेच बनावट मेसेज तयार करून दंड भरला असल्याचे भासवत पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून शासनासह वाहतूक विभागाला गंडा घालणारा पोलिसांच्या जाळ्यात सापडला. तब्बल 399 बनावट मेसेज तयार करून ते 39 व्यक्तींना पाठवत 81 हजार 212 रूपयांची फसवणूक त्याने केल्याचे समोर आले आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान हा प्रकारसुरू होता.असिफ अरीफ शेख ( रा. झांबरे पँलेस महर्षीनगर कोंढवा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेव्हन लव्हज चौकात स्वारगेट वाहतूक पोलीस वाहनांची तपासणी करीत असताना असिफ शेख याने त्याच्या मोबाईलवरील मेसेज दाखवून अगोदरच दंड भरल्याचे सांगितले. पोलिसांना या मेसेजचा संशय आला. त्यांनी तो बारकाईने पाहिला असता बनावट असल्याचे दिसून आले.मोबाईल तपासला असता स्वत:च्या मोबाईलवर पुणे पोलीस ई चलनद्वारे जसे मेसेज पाठवितात, त्यासारखेच दंड भरल्याचे बनावट मेसेज मोबाईलच्या मेसेज इनबॉक्समध्ये त्याने 39 लोकांना एकूण 399 बनावट मेसेज पाठवल्याचे आढळले.बनावट मेसेज असूनही ते वाहतूक पोलिसांना दाखवून दंडात्मक कारवाई केल्याचेच हे मेसेज असल्याचे भासवत पोलिसांची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपीवर स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त शेषराव सूर्यवंशी व वाहतूक शाखा परिमंडळ 2चे सहायक पोलीस निरीक्षक देवीदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक सुदाम पाचोरकर, पोलीस नाईक क्षीरसागर, पोलीस शिपाई जगताप आणि पोलीस शिपाई कोंडे यांनी भाग घेतला होता. स्वारगेटचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र पंडित पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Policeपोलिस