शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राज की उद्धव? शरद पवारांनी त्यावेळीच दिलं होतं उत्तर; व्हिडीओ पुन्हा होतोय व्हायरल
2
डॉ.शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट; सुसाईड नोटमध्ये महिलेचे नाव, मोठा खुलासा
3
काँग्रेसची राजकीय ताकद राहिली नाही, त्यासाठी काय करणार ? हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलं उत्तर
4
तोंड दाखवायला जागा...! मुलीच्या सासऱ्याबरोबरच मुलीची आई पळून गेली; मुलगा म्हणतो... 
5
अपघातात मृत्यू झालेल्या महिलेसोबत वॉर्ड बॉयचं संतापजनक कृत्य, संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद
6
सोलापुरातील डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; हॉस्पिटलमधील महिला प्रशासन अधिकाऱ्यास केली अटक
7
"मुळावरच घाव घालायचं काम चालू आहे", महाराष्ट्रात हिंदी सक्तीवरुन मराठी अभिनेता स्पष्टच बोलला
8
काश्मीरमध्ये ऐन उन्हाळ्यात ढगफुटी; अचानक आलेल्या पुरात २ जण वाहून गेले, १०० लोकांना वाचविले
9
तनिषा भिसे प्रकरण: पोलिसांच्या दबावापुढे ससून प्रशासन झुकले; पोलिसांनी 'या' ४ मुद्द्यांवर मागितला होता, 'अभिप्राय'
10
पुस्तकाच्या जन्माची गोष्ट : ‘ग्रेस’ यांचे पहिले पुस्तक असे आले
11
‘एआय’ ऐक ना रे माझं, तूच मला समजू शकतोस... खरंच एआय समजून घेतं का?
12
लेख : चिंब पावसानं रान औंदा होणार आबादानी!
13
साप्ताहिक राशीभविष्य: ४ राशींना बक्कळ लाभ, ४ राशींना मध्यम फलदायी; बचतीत फायदा, यश-प्रगती!
14
अवघ्या ०.०१३ रनरेटमुळे वेस्टइंडीजचा संघ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतून बाहेर
15
स्क्रीनच्या पलीकडची सुट्टी; पालक म्हणून मुलांसाठी तुम्ही इतक्या सगळ्या गोष्टी करू शकता
16
इलॉन मस्क यांच्या आईने जिंकली भारतीयांचे मने; पंतप्रधान मोदींच्या ट्विटला दिलं होतं उत्तर
17
अमेरिकेला राजा नको...! हजारो अमेरिकन डोनाल्ड ट्रम्प विरोधात रस्त्यावर; हिटलरची उपमा...
18
लेख: वेळप्रसंगी आम्ही ‘भ’ची बाराखडी जाहीरपणे म्हणून दाखवतो...
19
राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा, मात्र मनसेनं घेतला असा पवित्रा, संदीप देशपांडे म्हणाले,"महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे…”,,

‘फॅन्सी नंबर प्लेट’विरुद्ध वाहतूक पोलिसांची मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2017 17:25 IST

वाहतूक पोलिसांनी  ‘फॅन्सी नंबर प्लेट’विरुद्ध १ आॅक्टोबरपासून विशेष मोहिम सुरु केली आहे. गेल्या आठ दिवसात २१० वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून तब्बल २ लाख १० हजारांचा दंड वाहनचालकांकडून वसूल करण्यात आला.

पुणे - वाहतूक पोलिसांनी  ‘फॅन्सी नंबर प्लेट’विरुद्ध १ आॅक्टोबरपासून विशेष मोहिम सुरु केली आहे. गेल्या आठ दिवसात २१० वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून तब्बल २ लाख १० हजारांचा दंड वाहनचालकांकडून वसूल करण्यात आल्याची माहिती उपायुक्त अशोक मोराळे यांनी दिली. यासोबतच जागेवरच या नंबर प्लेट काढून टाकण्याची कारवाई केली आहे. वाहनावर फॅन्सी नंबर प्लेट लावणे बेकायदा आहे. आरटीओच्या नियमांनुसार ठराविक नमुन्यातीलच नंबर प्लेट वाहनावर असणे अपेक्षित आहे. मात्र, वाहनचालक अनेकदा आकर्षक आणि चित्रविचित्र नंबर प्लेट वाहनांवर लावतात. त्यामुळे अनेकदा वाहनाचा क्रमांक व्यवस्थित कळत नाही. अपघात झाला किंवा अपघातसदृश परिस्थिती निर्माण केल्यास त्या वाहनाचा क्रमांकही नागरिकांना व्यवस्थित टिपता येत नाही. अनेकदा वाहनांवर भाऊ, दादा, आप्पा, आई, साई, किंग, आण्णा आदी अक्षरे क्रमांकांच्या माध्यमातून तयार केली जातात. अशा भाऊ दादांना वाहतूक पोलिसांनी झटका द्यायला सुरुवात केली आहे. फॅन्सी नंबर प्लेट लावण्याचे प्रमाण वाढले असून नंबर प्लेट तयार करुन देणा-या दुकानदारांकडूनही नियमांचे पालन केले जात नाही. त्यामुळे कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. १ आॅक्टोबरपासून सुरु करण्यात आलेल्या या मोहिमेमध्ये दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांवर कारवाई केली जात आहे. दंडात्मक कारवाईसोबतच नंबर प्लेट काढून टाकण्याचीही कारवाई केली जात आहे. १ आॅक्टोबर ते ७ आॅक्टोबरदरम्यान २१० वाहनचालकांवर केलेल्या कारवाईमध्ये २ लाख १० हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सुरु असलेल्या या कारवायांमध्ये अनेक गमतीशीर नंबरप्लेट पोलिसांना पहायला मिळत आहेत. पुण्यात कारवाईदरम्यान थांबवलेल्या एका मोपेडवर तर चक्क  ‘नवरा’ अशी अक्षरे स्पष्टपणे दिसणारी नंबर प्लेट लावण्यात आलेली होती. तर एकाने ‘लव्ह’ अशी अक्षरेच ८०७९ या मराठी आकड्यांमधून तयार केली होती. तर एका दुचाकीवर ६१९२ या क्रमांकावरुन ‘ठाकूर’ अशी अक्षरे तयार केली होती. एका दुचाकीवर २२४१ या क्रमांकामधून  ‘रेश्मा’ हे अक्षर बनविले होते.

टॅग्स :Puneपुणे