शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

‘पीएमपी’ला सापडेनात वाहतूक व्यवस्थापक, वृत्तपत्रांच्या माध्यमातून हजर राहण्याची सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 05:26 IST

परवानगी न घेता गैरहजर असलेले निलंबित वाहतूक व्यवस्थापक सुनील गवळी हे पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) सापडत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनाने वृत्तपत्रांच्या माध्यमातून गवळी यांना कार्यालयात हजर राहण्याची सूचना केली आहे; अन्यथा सेवा समाप्त करण्याचा इशाराही या जाहीर सूचनेद्वारे देण्यात आला आहे.

पुणे : परवानगी न घेता गैरहजर असलेले निलंबित वाहतूक व्यवस्थापक सुनील गवळी हे पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) सापडत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनाने वृत्तपत्रांच्या माध्यमातून गवळी यांना कार्यालयात हजर राहण्याची सूचना केली आहे; अन्यथा सेवा समाप्त करण्याचा इशाराही या जाहीर सूचनेद्वारे देण्यात आला आहे.‘पीएमपी’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता गैरहजर राहिल्याप्रकरणी गवळी यांना निलंबित केले आहे. दि. ६ डिसेंबरपासून कार्यालयाची परवानगी न घेता व कार्यालयास न कळविता कामावर गैरहजर असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. यासंदर्भात प्रशासनाने दि. ९ जानेवारी रोजी वृत्तपत्रांतून प्रसिद्ध केलेल्या जाहीर सूचनेनुसार, यापूर्वी गवळी यांनी कार्यालयाला दिलेल्या पत्त्यावर कारणे दाखवा नोटीस टपालाने पाठविण्यात आली होती. ही नोटीस पत्ता अपूर्ण म्हणून परत आली. त्यानंतर पुन्हा दि. १८ डिसेंबरला गवळी यांच्या विभागीय चौकशीसाठी जोडपत्रे टपालाने पाठविण्यात आली. हे टपालही अपूर्ण पत्ता म्हणून परत आले आहे. त्यानंतर कार्यालयीन सेवकामार्फत त्यांच्या घरी हा पत्रव्यवहार पाठविण्यात आला असता, घर बंद असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.उपलब्ध सर्व मार्गांचा प्रयत्न करूनही गवळी कार्यालयाशी संपर्क करीत नाहीत, पत्रव्यवहारांना प्रतिसाद देत नाहीत. विभागीय चौकशीचे पुढील कामकाज करणे शक्य होत नाही. गवळी यांना सात दिवसांच्या आत संपर्क साधण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. अन्यथा सात दिवसांनंतर सर्व आरोप सिद्ध झाले, असे गृहीत धरून सेवा समाप्त करण्यात येतील, असे जाहीर सूचनेद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, गवळी वैद्यकीय कारणास्तव कामावर रुजू होत नसल्याचे समजते. त्यांनी प्रशासनाकडे दोन वैद्यकीय प्रमाणपत्रेही सादर केली आहेत. तसेच ते दिलेल्या मुदतीत हजर होऊ शकतात, असेही सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणे