वाहतूक कोंडीत पुणे ठप्प!, नागरिकांचे प्रचंड हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 01:32 AM2018-07-18T01:32:01+5:302018-07-18T01:32:05+5:30

मुठा नदीत सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदीपात्रातील बंद केलेला रस्ता, पावसामुळे नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात रस्त्यावर आलेल्या मोटारी, बेशिस्त वाहनचालक आणि सुरू असलेला पाऊस यामुळे संपूर्ण पुणे शहर मंगळवारी वाहतूककोंडीत अडकले होते.

The traffic jam in Pune, the huge crowd of citizens | वाहतूक कोंडीत पुणे ठप्प!, नागरिकांचे प्रचंड हाल

वाहतूक कोंडीत पुणे ठप्प!, नागरिकांचे प्रचंड हाल

Next


पुणे : मुठा नदीत सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदीपात्रातील बंद केलेला रस्ता, पावसामुळे नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात रस्त्यावर आलेल्या मोटारी, बेशिस्त वाहनचालक आणि सुरू असलेला पाऊस यामुळे संपूर्ण पुणे शहर मंगळवारी वाहतूककोंडीत अडकले होते. सकाळी ९ वाजता सुरू झालेली ही कोंडी सुरळीत होण्यास दुपारचे दोन वाजले़ धरणातून होणारा विसर्ग कमी करण्यात आल्यानंतर, सायंकाळी नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याने सायंकाळी घरी जाणाऱ्या पुणेकरांना या वाहतूककोंडीतून काहीसा दिलासा मिळाला; मात्र तरीही अनेक रस्त्यांवर रात्रीपर्यंत वाहतूककोंडी होती. खडकवासला धरणातून नदीत पाणी सोडण्यात आल्याने सोमवारी दुपारनंतर डेक्कन जिमखाना येथील बाबा भिडे पूल व नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता़ यामुळे येथून होणाºया वाहतुकीचा सगळा ताण इतर रस्त्यांवर आला. कर्वे रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता, जंगलीमहाराज रस्ता, केळकर रस्ता आणि लक्ष्मी रस्त्यावर प्रचंड वाहतूककोंडी झाली. मंगळवारी सकाळ पुणेकर कामाला घरातून बाहेर पडले आणि या वाहतूककोंडीच्या चक्रात अडकले़ मुख्य रस्त्यावर वाहतूककोंडी झाल्याने अनेक दुचाकी, चारचाकी वाहनचालकांनी आपला मोर्चा कडेच्या गल्ल्यांमध्ये वळविला़ त्यामुळे प्रभात रोड, भांडारकर रोडला लागून असलेल्या गल्ल्या, चौक, आपटे रोड, फर्ग्युसन रोड यावरही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत होत्या़ प्रत्येकाचीच पुढे जायची घाई, समोरून येणाºया वाहनांना जागा न देण्याची वृत्ती त्यामुळे या कोंडीत आणखीच भर पडली़ त्यामुळे एरवी जेथे दहा ते पंधरा मिनिटे जाण्यास लागत होते, त्याच अंतरासाठी आज अर्धा ते एक तास वाहनचालकांना वाहतूककोंडीत अडकून पडावे लागले़ त्यामुळे अनेकांना आपल्या कार्यालयात जाण्यास उशीर झाला़
पावसामुळे अनेक ठिकाणी सिग्नल बंद होते. त्यामुळे वाहतूक- कोंडीत आणखीनच भर पडली. त्यात पोलिसांचे नियोजनही दिसत नव्हते. वाहतूककोंडीने संपूर्ण शहर ठप्प झाल्यावर, वाहतूक पोलिसांसह इतर पोलीसही रस्त्यावर उतरले. वाहतूक नियंत्रण कक्षाने ही वाहतूककोंडी लक्षात घेऊन, जादा अधिकारी आणि कर्मचारी यांचा बंदोबस्त वाढविला़ अनेक चौकांतील सिग्नल बंद करून पोलिसांनी हाताने नियंत्रण करून वाहतूककोंडी सोडविण्याचा प्रयत्न केला़ सकाळची परिस्थिती लक्षात घेऊन वाहतूक शाखेने अधिक
कुमक नदीकडेच्या सर्व रस्त्यांवर सायंकाळी तैनात करण्यात आली़ सायंकाळी नदीपात्रातील रस्ता व बाबा भिडे पूल वाहतुकीला खुला करण्यात आल्याने वाहतूक बºयाच प्रमाणात सुसह्य झाली होती़
>बंद पडलेल्या बसमुळे कोंडीत भर
सोमवारी शहराच्या वेगवेगळ्या भागात तेरा ठिकाणी पीएमपी बस बंद पडल्या. त्यामुळे कोंडीत भर पडली. मंगळवारी शहराच्या वेगवगेळ्या भागात पीएमपी बस बंद पडल्या. वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाकडे आलेल्या माहितीनुसार : शहरात सायंकाळपर्यंत सात ठिकाणी पीएमपी बस बंद पडल्या. बिबवेवाडीतील पुष्पमंगल चौक, येरवडा भागातील चंद्रमा चौक, मध्यभागातील जिजामाता चौक, चिंचवड येथील महावीर चौकासह सात ठिकाणी पीएमपी बस बंद पडल्या.
> कोंडीची कारणे
रस्त्यावर गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे
रस्त्याच्या कडेला ड्रेनेज नसल्याने साठलेले पाणी
पावसाची शक्यता लक्षात घेऊन अनेक पुणेकरांनी बाहेर काढलेल्या मोटारी
वाहतूक पोलिसांच्या नियोजनअभावी प्रत्येकाचीच पुढे निघण्याची घाई
बेशिस्त वाहनचालकांनी मध्येच वाहने घुसविल्याने दोन्ही बाजूंकडील रस्ते ब्लॉक
सकाळच्या वेळी पावसाने दिलेल्या उघडिपीमुळे एकाचवेळी बाहेर पडलेले नागरिक
>संपूर्ण शहरातच कोंडी
संपूर्ण शहरातच वाहतूककोंडी झाल्याचे दृश्य मंगळवारी पाहावयास मिळाले. हडपसर- पासून ते चांदणी चौकापर्यंत आणि वाघोलीपासून पुणे विद्यापीठापर्यंत वाहतूककोंडी झाली होती. रस्त्यावर साठलेल्या पाण्यामुळे वाहनांचा वेग कमी झाल्याने, वाहतूककोंडीत अधिक भर पडली. काही नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने वाहतूक नियोजन करण्यास सुरुवात केली; मात्र त्यांना अंदाज नसल्याने वाहतूक- कोंडीमध्ये जास्त भर पडली.

Web Title: The traffic jam in Pune, the huge crowd of citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.