शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

फुरसुंगी आणि ऊरुळी देवाची येथील टीपी स्कीमला महापालिकेची मंजुरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 12:43 IST

महापालिकेच्या हद्दीमध्ये अकरा गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. पीएमआरडीएचा प्रस्तावित रिंग रोड या अकरा गावांपैकी असलेल्या उरुळी देवाची आणि फुरसुंगीमधून जात आहे.

ठळक मुद्देबाह्यवळण मार्ग : नव्याने समाविष्ट झालेल्या अकरापैकी दोन गावांचा समावेशही गावे महापालिकेच्या हद्दीमध्ये समाविष्ट होण्यापुर्वी पीएमआरडीएने याबाबतचा आराखडा केला होता तयार संबंधित जमीन मालकांनी या योजनेला संमती दर्शविली असून या योजनेसाठी इरादा जाहीर केला जाणार

पुणे : पीएमआरडीएकडून पुण्याभोवती तयार करण्यात येत असलेल्या रिंग रोडच्या टप्प्यात येत असलेल्या दोन गावांमध्ये महापालिका तीन ठिकाणी टीपी स्किम राबविणार आहे. उरुळी देवाची येथे एक तर फुरसुंगीमध्ये दोन ठिकाणी ही योजना राबविण्यात येणार आहे. पालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये या टीपी स्किमचा इरादा जाहीर करण्यास मंजुरी देण्यात आली.महापालिकेच्या हद्दीमध्ये अकरा गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. पीएमआरडीएचा प्रस्तावित रिंग रोड या अकरा गावांपैकी असलेल्या उरुळी देवाची आणि फुरसुंगीमधून जात आहे. या गावांमध्ये तीन ठिकाणी टीपी स्किम राबविण्यात येणार असून त्यासाठी पीएमआरडीएकडून तांत्रिक मदत (टेक्निकल सपोर्ट) घेतली जाणार आहे. ही गावे महापालिकेच्या हद्दीमध्ये समाविष्ट होण्यापुर्वी पीएमआरडीएने याबाबतचा आराखडा तयार केला होता. तो आराखडा महापालिकेला सुपुर्द करण्यात आला.   त्यानुसार प्रशासनाने टिपी स्किम करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. संबंधित जमीन  मालकांनी या योजनेला संमती दर्शविली असून या योजनेसाठी इरादा जाहीर केला जाणार आहे. फुरसुंगी गावामधील सुमारे ३९ किमी लांबीच्या आणि उरुळी देवाची येथील ७३० मीटर लांबीच्या रस्त्याची जागा विना मोबदला प्राप्त होणार आहे. त्यामुळे नुकसान भरपाईची रक्कम मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. जमिनधारकांसोबत भागीदारी पध्दतीने नियोजन करून परिसराचा सुनियोजित विकास करुन वाहतूक कोंडी, पाणी व इतर समस्या सोडविता येणार आहेत. यासंबंधीच्या प्रस्तावाला शहर सुधारणा समितीने मंजुरी दिलेली होती.  ====गाव                                                           क्षेत्रक्षेत्र उरुळी देवाची (टीपीएस क्र. ६)        १०८ हेक्टर फुरसुंगी (टीपीएस क्र. ९)                       २६२ हेक्टर फुरसुंगी (टीपीएस क्र. १०)                    ३०२ हेक्टर  ====इरादा जाहीर केल्यांतर स्थानिक पातळीवर चर्चा करून प्रा-रूप आराखडा तयार केला जाणार असून हा आराखडा सर्वसाधारण सभेमध्ये मान्यतेसाठी सादर करण्यात येणार आहे. स्कीमसाठी कालावधी निश्चित करण्यात येणार असल्याचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी यावेळी सभेसमोर सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPMRDAपीएमआरडीए