शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकांच्या नेहमीच पसंतीस उतरणा-या ताम्हिणी घाट रस्त्याला वन विभागाचा '' खो ''

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 16:28 IST

निसर्ग संपदेचा अनुभव घेण्यासाठी निसर्गप्रेमींची वर्षभर ताम्हिणी घाट परिसरात मोठ्या प्रमाणात वर्दळ असते...

ठळक मुद्देपौड ते ताम्हिणी घाटापर्यंतच्या रस्त्याचे काम करणे शक्य होत नसल्याची माहिती समोर वन जमिनीची खासगी मालकी असणा-या व्यक्तींना संबंधित जमिनीचा मोबदला द्यावा लागणार परिसरात वैविध्यपूर्ण फुले,पक्षी आणि वन्यजीव आढळतात काही वन अधिका-यांच्या चूकीच्या कार्यपध्दतीमुळे भूसंपादनाच्या कामात अडथळे

पुणे:  पर्यटकांच्या नेहमीच पसंतीस उतरणा-या आणि प्रत्येक पावसाळ्यात तरूणाईच्या गर्दीमुळे सजणा-या ताम्हिणी घाटापर्यंत जाण्यासाठी चांगला रस्ता करण्याचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात आला आहे. मात्र, रस्त्याच्या रुंदीकरणासाठी लागणारी जमीन देण्यास वन विभागाकडून खो घातला जात आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) पौड ते ताम्हिणी घाटापर्यंतच्या रस्त्याचे काम करणे शक्य होत नसल्याची माहिती समोर आली आहे.

ताम्हिणी घाटाचा परिसर भौगोलिक व नैसर्गिक दृष्ट्या संपन्न असून येथे वैविध्यपूर्ण फुले,पक्षी आणि वन्यजीव आढळून येतात. त्यामुळे या परिसरातील निसर्ग संपदेचा अनुभव घेण्यासाठी निसर्गप्रेमींची वर्षभर या परिसरात मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्याचप्रमाणे पुण्यातून कोकणाात जाणा-यांसाठी ताम्हिणी घाट सोयीस्कर ठरतो.ताम्हिणी रस्त्याचे काम झाल्यास कोकण पर्यटनाला अधिक चालना मिळू शकते. त्यामुळेच एमएसआरडीसीने या रस्त्याचे काम करण्याचा निर्णय घेतला. मात्र, पौड ते ताम्हिणी दरम्यान काही भागात रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी भूसंपादन करावे लागणार आहे. परंतु, वन विभागातील काही अडेलतट्टू अधिका-यांकडून रस्ता रुंदीकरणाचे काम खोळंबले असल्याचे एमएसआरडीसीकडून सांगितले जात आहे.रस्त्यालगत असणारी सर्वच वन जमिन ही वन विभागाच्या मालकीची नाही.तर काही वन जमिनीचे सातबारा शेतक-यांच्या नावे आहेत. त्यामुळे रस्त्यासाठी भूसंपादन केल्यानंतर वन जमिनीची खासगी मालकी असणा-या व्यक्तींना संबंधित जमिनीचा मोबदला द्यावा लागणार आहे. मात्र, मुळशी परिसरातील वन अधिका-यांसह वरिष्ठ कार्यालयातील काही वन अधिका-यांच्या चूकीच्या कार्यपध्दतीमुळे भूसंपादनाच्या कामात अडथळे येत आहेत. त्यामुळे पौड ते ताम्हिणी पर्यंतच्या सुमारे 70 कि.मी. रस्त्यापैकी 30 कि.मी.रस्त्याचे काम करता येत नाही, असे एमएसआरडीसीतील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. दरम्यान, याबाबत पुणे वन विभागाच्या उपवनसंरक्षक श्रीलक्ष्मी ए. यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

टॅग्स :Paudपौडforestजंगल