खोर ग्रामपंचायतवर कुल गटाचा झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:11 AM2021-01-19T04:11:17+5:302021-01-19T04:11:17+5:30
खोर : खोर (ता. दौंड) येथील ग्रामपंचायत वर पुन्हा एकदा आमदार राहुल कुल गटाचा झेंडा प्रस्थापित झाला आहे. ११ ...
खोर : खोर (ता. दौंड) येथील ग्रामपंचायत वर पुन्हा एकदा आमदार राहुल कुल गटाचा झेंडा प्रस्थापित झाला आहे. ११ जागेपैकी ८ जागा या आमदार राहुल कुल गटाच्या ताब्यात आल्या असून, ३ जागा या माजी आमदार रमेश थोरात गटाकडे गेल्या आहेत. प्रभाग क्र १ (डोंबेवाडी) यामध्ये कुल गटाचे राहुल डोंबे ८ मतांंनी, रेश्मा डोंबे ७६ मतांंनी तर कमल फडतरे ४७ मतांंनी विजयी झाले आहेत. प्रभाग क्र २ (खिंडीचीवाडी)मध्ये पोपट चौधरी, ज्योती शिंदे व सोनाली मोटे या तिन्ही जागा कुल गटाच्या बिनविरोध झाल्या आहेत. प्रभाग क्र ३ (पिंंपळाचीवाडी)मध्ये राहुल कुुुल गटाचे उज्ज्वला चौधरी व रमेश थोरात गटाचे विठ्ठल चौधरी हे बिनविरोध झाले आहेत.
संपूर्ण खोर गावाचे लक्ष लागून असलेल्या प्रभाग क्र ४ (खोरगावठाण-हरीबाचीवाडी) मध्ये मोठी कसरत पाहावयास मिळाली. यामध्ये दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामचंद्र चौधरीविरुद्ध भाऊसाहेब कुदळे यांच्यात जोरदार लढत होऊन माजी आमदार रमेश थोरात गटाचे कट्टर समर्थक रामचंद्र चौधरी हे ५६ मतांंनी विजयी झाले आहेत, तर रमेश थोरात गटाकडून वैशाली अडसूळ तब्बल १८१ मतांंनी तर आमदार राहुल कुल गटाच्या उज्ज्वला चौधरी या ४० मतांंनी विजयी झाल्या आहेत.
चौकट : गड आला, पण सिंह गेला
खोर ग्रामपंचायतवर जरी सध्या आमदार कुल गटाचे वर्चस्व प्रस्थापित झाले असले, तरी सरपंच पदाचे आरक्षण कोणते निघते, यावर सर्व काही अवलंबून राहणार आहे. कारण निवडणुकीच्या आधी अनुसूचित जातीतील महिलाचे आरक्षण निघाले होते. त्यानुसार, जर पुन्हा तेच आरक्षण निघाले, तर आमदार राहुल कुल गटाच्या ८ जागा येऊनही फायदा होणार नाही. कारण अनुसूचित जातीतील महिला ही वैशाली अडसूळ या थोरात गटाकडून निवडून आल्या आहेत. त्यामुळे खोर ग्रामपंचायत वर गड आला, पण सिंह गेला, सारखे कामकाज झाले आहे. त्यामुळे सरपंच पदाचे आरक्षण पुन्हा काय निघते, याकडे गावचे लक्ष लागले आहेत.