शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

कर्जमाफीसाठीचे तब्बल १ लाख अर्ज अपात्र , उर्वरित गावांतील चावडी वाचन लवकरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 03:00 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर लाभासाठी आलेल्या अर्जांपैकी तब्बल १ लाख १४ हजार ८४६ अर्ज अपात्र ठरले आहेत. या योजनेसाठी २ लाख ९८ हजार ५६ आॅनलाइन अर्ज आले होते.

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर लाभासाठी आलेल्या अर्जांपैकी तब्बल १ लाख १४ हजार ८४६ अर्ज अपात्र ठरले आहेत. या योजनेसाठी २ लाख ९८ हजार ५६ आॅनलाइन अर्ज आले होते, अशी माहिती सहकार विभागातील सूत्रांनी दिली आहे. अर्ज बाद झाल्याची अधिकृत आकडेवारी सल्याचे सहकार विभागातील अधिकाºयांनी सांगितले आहे. परंतु, एकूण अर्जांपैकी दहा ते बारा टक्के अर्जबाद होणार असल्याचे दिसून आल्याचे सांगितले आहे.कर्जमाफीचा लाभ मिळविण्याकरिता राज्यातील शेतकºयांना अर्ज भरण्यासाठी २२ सप्टेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली. त्यानुसार पुणे जिल्ह्यातून २ लाख ९८ हजार अर्ज आले. ३० जून रोजी थकबाकीदार असलेल्या शेतकºयांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे. तर कर्ज परतफेड करणाºयांना पंचवीस टक्के तर, कमाल पंचवीस हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर निधी अशा तीन टप्प्यांत लाभ देण्यात येणार आहे.दरम्यान, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे २ लाख ९९ हजार, व्यावसायिक आणि खासगी बँकांचे अनुक्रमे ४० हजार असे एकूण ३ लाख ३९ हजार कर्जदार शेतकरी जिल्ह्यात असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारला दिली होती.पुण्यात शेती असलेल परंतु, पुण्याबाहेर राज्यभरातील विविध ठिकाणी स्थायिक झालेल्या शेतकºयांची संख्या ५ हजार ४३५ एवढी असल्याचे छाननी प्रक्रियेमध्ये निष्पन्न झाले. त्यामुळे पुणे जिल्ह्यातून आलेल्या २ लाख ९८ हजार ५६ अर्जांमध्ये या अर्जांची भर पडली असून, जिल्ह्यातून कर्जमाफीकरिता एकूण ३ लाख ३ हजार ४९१ अर्ज प्राप्त झाल्याची नोंद शासन स्तरावर आहे. जिल्ह्यातील तेरा तालुक्यातील १ हजार ४६४ गावांमध्ये कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर लाभ योजनेच्या अर्जदारांच्या याद्यांचे जाहीर चावडी वाचन करण्यात आले आहे.चावडी वाचनामध्ये १ हजार २४१ गावांमध्ये चावडीवाचन पूर्ण झाले आहे तर, ग्रामपंचायत निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू असल्याने २२३ गावांमध्ये चावडीवाचनाची प्रक्रिया होऊ शकलेली नाही. ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया संपल्याबरोबरच लागलीच उर्वरित गावांमधील चावडीवाचन होणार आहे.कोणते टप्प्यातील अर्ज अधिक बाद ?योजनेसाठी आलेल्या अर्जांची छाननी करताना एकूण अर्जांपैैकी दहा ते बारा टक्के अर्ज बाद होण्याचा अंदाज होता. मात्र, जिल्ह्यातून एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकरी अपात्र झाल्याची अधिकृत आकडेवारी आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही. राज्य शासनाकडून तीन टप्प्यांमध्ये कर्जमाफी मिळणार आहे. त्यामुळे नेमक्या कोणत्या टप्प्यातील आकडेवारी समोर आली आहे, याबाबत माहिती नाही, अशी माहिती सहकार विभागाकडून मंगळवारी देण्यात आली.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार