शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
2
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
3
"काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
4
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
5
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
6
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
7
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
8
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
9
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
10
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
11
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
12
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
13
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
14
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
15
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
16
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
17
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
18
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
20
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!

मशाल मिरवणुकीने तोरणागड उजळला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 1:50 AM

दसरा सणाच्या निमित्ताने मावळा जवान संघटना व वेल्हे ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेल्या मशाल मिरवणुकीने हिंदवी स्वराज्याचा मानबिंदू तोरणागड उजाळून निघाला.

मार्गासनी : दसरा सणाच्या निमित्ताने मावळा जवान संघटना व वेल्हे ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेल्या मशाल मिरवणुकीने हिंदवी स्वराज्याचा मानबिंदू तोरणागड उजाळून निघाला. फटाक्यांच्या आतषबाजीत, हर हर महादेव, जय शिवराय या जयघोषांनी तोरणागडाची दरीखोरी निनादली. पारंपरिक रिवाजात छत्रपती शिवाजी महाराज यांना मावळ्यांतर्फे मानवंदना देण्यात आली.गडावरील शिवकालीन मेंगाईदेवीच्या महापूजेने मशाल मिरवणुकीला सुरुवात झाली. देवीचे मानकरी प्रमोद पवार, विलास पांगारे, संदीप नगिणे, अनिल भुरूक, गोरख भुरूक, रामभाऊ राजीवडे, अशोक सावंत, अशोक पवार, हेमंत पाटील, तानाजी राजीवडे, बापू साबळे, सुनील गाडे, संजय भुरूक आदींसह शेकडो तरुण सहभागी झाले होते.हिंदवी स्वराज्याचा मानबिंदू म्हणून या गडाचे मोठे स्थान आहे. गडावरील शिवकालीन मेंगाईदेवी, तोरणजाई आदी देवतांचा नवरात्र उत्सव, दसरा सण गडावर शिवकाळापासून साजरा केला जात आहे. मशाल मिरवणुकीने तोरणागडाच्या इतिहासाला, छत्रपती शिवरायांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.>शिवरायांच्या देदीप्यमान इतिहासाचे झाले पुन:स्मरणतोरणागडाच्या बिन्नी दरवाजापासून झुंजारमाची ते कोकण दरवाजापर्यंतचा गडाचा परिसर शेकडो मशालींच्या प्रकाशाने उजळून निघाला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी परकी मोगलांच्या जुलमी राजवटीविरुद्ध मूठभर मावळ्यांच्या साथीने यशस्वी लढाई करून तोरणागड जिंकला. तोरणागड हा स्वराज्याचा पहिला किल्ला.