पुणे : टोमॅटोला दहा किलोमागे केवळ ४० ते ८० रुपये दर मिळत असून शेतकऱ्यांना वाहतूक खर्चही परवडेनासा झाला आहे. रविवारी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत तब्बल साडेपाच हजार ते सहा हजार क्रेटची आवक झाली.पुण्याच्या बाजार समितीत पुणे जिल्हा, अहमदनगर, सोलापूर या भागातून टोमॅटो विक्रीसाठी येतात. काही दिवसांपूर्वी टोमॅटोला चांगले दर मिळत होते. आवक आणि मागणीचा समतोल राहिल्याने अनेक दिवस दर स्थिर होते. परंतु दसºयाची सुट्टी, शनिवारी बाजार समितीत बंद यामुळे रविवारी एकाच दिवशी मोठ्या प्रमाणात आवक झाली. त्यामुळे किलोमागे १० ते १५ रुपयांचे असलेले दर थेट ४ ते ८ रुपयांपर्यंत खाली घसरले, अशी माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.कांदा उत्पादक अडचणीतचाळीसगाव : कांद्याला कमी भाव मिळत असल्याने शेतकºयांनी रविवारी मार्केट बंद पाडले. तीन तासांनी लिलाव पुन्हा सुरू झाले. बाजार समितीच्या संचालकांनी शेतकरी व व्यापाºयांशी बोलून लिलाव सुरू केले.>उत्पादन जास्त आणि मागणी कमी, अशी स्थिती झाली आहे. १०० किमीवरून खर्च करून आम्ही टोमॅटो बाजारात आणतो. मात्र दर पडल्याने वाहतुकीचा खर्च देखील निघत नाही.- नवनाथ शेळके, शेतकरी
टोमॅटो मातीमोल, वाहतूक खर्चही निघेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 03:40 IST