शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पुणे-सोलापूर महामार्गावर टोलमुक्ती; कवडीपाट व कासुर्डी टोलनाका बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 02:22 IST

१४ वर्षे केली वसुली, सेवारस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष

लोणी काळभोर : पुणे-सोलापूर रस्त्यावरील कवडीपाट टोलनाका रविवारी मध्यरात्री मुदत संपल्याने बंद करण्यात आला आहे.आर्यन टोल रोड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने पुणे-सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कवडीपाट टोलनाका कासुर्डी (ता. दौंड) या भागातील चौपदरी रस्त्याचे काम ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ तत्त्वावर केले. गेली १४ वर्षे टोलवसुलीचे काम नियमानुसार सुरू होते. सदर टोलवसुलीची मुदत रविवारी (दि. १० मार्च) संपली. त्यामुळे रविवारी रात्री १२ पासून येथून वाहने विनाटोल ये-जा करीत आहेत. शासनाने ठरवलेल्या नियमांप्रमाणे कंपनीने रस्त्याची दुरुस्ती केली असली, तरी प्रवाशांना शौचालय, मुख्य चौकातील दिवे, काही ठिकाणच्या सर्व्हिस रोडवर संरक्षक जाळ्या, रुग्णवाहिका आदी सोयीसुविधा देण्याबाबत आजअखेर सदर कंपनीने असमर्थता दाखवली आहे.आयआरबी कंपनीला कवडीपाट ते यवत या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम २० फेब्रुवारी २००३ रोजी झालेल्या करारानुसार मिळाले होते. या २७ किलोमीटरच्या कामासाठी त्या वेळी ८८ कोटी रुपयांचे बजेट तयार करण्यात आले होते. रस्त्याचे काम पूर्ण करून सन २००४पासून टोलवसुलीचे काम सुरू केले आहे. १४ वर्षे टोलवसुली करण्याची परवानगी शासनाने दिली होती.त्यानुसार कंपनी कवडीपाट, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर (ता. हवेली) येथे व कासुर्डी (ता. दौंड) या दोन टोलनाक्यावर वसुली करत होती. ज्या गांभीर्याने टोलवसुली करण्यात येत होती, त्या गंभीरतेने प्रवाशांना सुविधा मात्र उपलब्ध करून दिल्या जात नसल्याचे जाणवत होते. या महामार्गावरून दररोज हजारो लहानमोठी वाहने ये-जा करतात; परंतु महिलांसाठी एकही शौचालय दोन टोलनाक्यांदरम्यान अद्यापही उपलब्ध नाही.२००४मध्ये हा रस्ता नवीन तयार झाला तेव्हा मुख्य महामार्ग व सर्व्हिस रोड यांच्यामध्ये एक लोखंडी जाळी टाकण्यात आली होती. परंतु, हळूहळू ही जाळी गायब झाली. परत जाळी टाकण्यासाठी टोल कंपनीने काहीही प्रयत्न केलेले नाहीत. मुख्य महामार्ग व सर्व्हिस रोड यांच्यामध्ये असणारी जाळी उभी करण्यासाठी छोटासा फुटपाथ तयार करण्यात आला. जाळीची चोरी होऊ लागली तसेच त्याखालचा फुटपाथही आपोआपच तुटला. हा तुटलेला फुटपाथ दुरुस्त करण्याची तसदी घेण्यात आलेली नव्हती.नियमानुसार टोल कंपन्या आपल्या टोलनाक्याच्या हद्दीत एखादा अपघात झाला, तर जखमींना तातडीची मदत मिळावी म्हणून एखादी अ‍ॅम्ब्युलन्स तयार ठेवतात. या कंपनीने ठेवलेली अ‍ॅम्ब्युलन्स आजअखेर कधीच कुणी पाहिलेली नाही. या २७ किलोमीटरच्या अंतरात कंपनीने फक्त लोणी काळभोर फाटा व थेऊर फाटा या दोनच ठिकाणी दिवे स्वत: बसविले आहेत.इतर ठिकाणी खासगी व्यक्ती, औद्योगिक कंपन्या, शैक्षणिक संस्था यांनी मोठे-मोठे दिवे बसवून दिले आहेत. ‘टोल कंपनीने स्वत: बसविलेले सर्व दिवे चालू दाखवा व एक लाख रुपये बक्षीस मिळवा’ असे बक्षीस जाहीर केले, तरी कुणालाच ते बक्षीस मिळणार नाही, याची प्रचंड खात्री व आत्मविश्वास टोल कंपनीला होता. त्यामुळे सदरचे दिवे चालू करण्याची तसदीही टोल कंपनीने कधीच घेतली नाही. प्रवाशांच्या नशिबाने दिवे चालू झाले तर ठीक, नाही तर तक्रारीची अजिबात दखल घेतली जात नव्हती.पावसाळ्यात बऱ्याच ठिकाणी खड्डे पडत आहेत. याकडेही लक्ष देण्यास टोल वसूल करणाऱ्या कंपनीला अजिबात वेळ नव्हता. टोलवसुली करणारी कंपनी, सार्वजनिक बांधकाम विभाग व परिसरातील राजकीय नेतेमंडळी यांपैकी कुणालाच रस्त्याच्या संदर्भात जनतेची काळजी घ्यावी, असे वाटले नाही.या टोल कंपनीच्या आधिकाऱ्यांबरोबरच सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी झोपले होते.सदर महामार्गाचा ताबा कंपनीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित केला. तत्पूर्वी, कंपनीने रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या पदपथावरील चोरीस गेलेल्या जाळ्या पुन्हा बसवल्या आहेत.परंतु, त्याच्या गुणवत्तेबाबत सर्व जण साशंक आहेत. रस्तादुभाजकाची उंची काही ठिकाणी वाढवली आहे. महामार्गालगत असलेल्या साईडपट्ट्यांमध्ये मुरूम भरला असला, तरी तो पाणी टाकून व्यवस्थित बसला नसल्याने जाड मुरमाने आपले डोके वर काढले असून दुचाकीस्वारांना तो नसून अडचण, असून अडथळा ठरत आहे.

टॅग्स :tollplazaटोलनाका