शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?
2
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
3
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
4
1 जुलैपासून नवा कोच राहुल द्रविडची जागा घेणार; बीसीसीआयने अर्ज मागविले, या अटी ठेवल्या....
5
एका अटीवर सलमान खानला माफ करु शकतो बिष्णोई समाज, वाचा काय आहे नेमका तोडगा
6
"वारसा चालवण्यासाठी मुल जन्माला घालण्यात अर्थ नाही, जर..," पाहा काय म्हणाले Zerodhaचे Nikhil Kamath
7
इराणचं चाबहार बंदर भारताच्या ताब्यात; अमेरिकेला मिरची झोंबली, चीन-पाकलाही धक्का
8
होर्डिंग पडलेल्या ठिकाणीच नेते भिडले! संजय दिना पाटील किरीट सोमय्यांवर भडकले
9
'घोटाळ्याच्या चौकशीसाठी भुजबळांनी...';राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट मोदींना लिहीलं पत्र
10
पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; श्रीराम फायनान्सचे शेअर्स वधारले, सिप्लाच्या शेअरमध्ये घसरण
12
EPFO ची कोट्यवधी लोकांसाठी गूड न्यूज! घर, लग्न, आजार, शिक्षणासाठी ऑटो क्लेम सोल्युशन लाँच; पाहा
13
सावत्र लेक दिया मिर्झाला म्हणत नाही आई, अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली- "ती मला..."
14
पीओकेमधील गोंधळामुळे पाकिस्तान सरकारने गुडघे टेकले! २३ अब्ज रुपयांचा निधी जाहीर
15
LICची लखपती स्कीम! केवळ रोज ₹४५ रुपये जमा करून मिळवू शकता ₹२५ लाख; पाहा संपूर्ण डिटेल
16
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
17
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
18
ईशा गुप्ताने केले आहेत Eggs Freeze, म्हणाली- "मी आज ३ मुलांची आई असते, पण..."
19
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
20
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता

गुप्त माहितीसाठी टोल फ्री क्रमांक हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 4:04 AM

अंतर्गत सुरक्षेमध्ये गुप्त माहिती मिळणे महत्त्वाचे असते.

पुणे : अंतर्गत सुरक्षेमध्ये गुप्त माहिती मिळणे महत्त्वाचे असते. ती मिळविण्यासाठी टोल फ्री क्रमांकाची निर्मिती करावी. यावर मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करणारी यंत्रणा निर्माण केल्यास संघटित गुन्हेगारी, दहशतवाद्यांची माहिती मिळण्यास मदत होईल,असे प्रतिपादन पुद्दुचेरीच्या राज्यपाल किरण बेदी यांनी व्यक्त केले.सेंटर फॉर अ‍ॅडव्हान्स स्ट्रॅटेजिक स्टडी (सीएएसएस) संस्थेतर्फे यशदा येथील सभागृहात ‘राष्ट्रीय सुरक्षा : संधी आणि आव्हाने’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यात ‘अंतर्गत सुरक्षा’ या विषयावर किरण बेदी बोलत होत्या.बेदी म्हणाल्या, देशात कट्टरतावाद, जातीयवाद, दहशतवाद, ड्रग ट्राफिकिंग, संघटित गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. राज्यामध्ये राजकीय फायद्यासाठी दंगली घडविल्या जात आहेत. यामुळे देशांच्या अंतर्गत सुरक्षेसमोर आव्हान निर्माण झाले आहे. हे धोकादायक आहे. यामुळे वेळीच या गुन्ह्यांची माहिती व्हावी, यासाठी पुद्दुचेरी येथे टोल फ्री क्रमांकाची निर्मिती करण्यात आली आहे. याद्वारे गुप्त माहिती मिळविली जात आहे. देशातही अशाच प्रकारची यंत्रणा विकसित करावी.टीसीए राघवन म्हणाले, अफगाणिस्तानच्या धोरणाकडे व्यूहरचनात्मक आणि डावपेचात्मक बघितले जाते. अफगाणिस्तानच्या विकासासाठी भारतीय यंत्रणांचे मोठे कार्य आहे. सांस्कृतिक, आर्थिक, आरोग्यविषयक देवाणघेवाण यामुळे दोन्ही देशांचे संबंध अधिक सुदृढ होत आहेत.लेफ्टनंट जनरल सैद अता हसनैन म्हणाले, चीन झपाट्याने आर्थिक प्रगती करीत आहे. हे करत असताना दीर्घकालीन डावपेच रचून त्यांची अंमलबजावणी करीत आहे. आज सीमाप्रश्नावरून दोन्ही देशात तणाव असला, तरी भविष्यात युद्ध होणे शक्य नाही. पाकिस्तानला मदत करून भारताला दोन आघाड्यांवर लढावे लागेल, अशी परिस्थिती निर्माण करून भारताला त्यात व्यस्त राखण्याचे धोरण चीन आखत आहे.निवृत्त अ‍ॅडमिरल अनुप सिंग म्हणाले, चीन हिंदी महासागरात आपले वर्चस्व निर्माण करू पाहत आहे. त्याला शह देण्याचे काम भारत करू शकतो. त्या दृष्टीने भारताने धोरणे आखायला हवी.