शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

आता गुगल मॅपवर शोधता येणार स्वच्छता गृहे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 07:00 IST

एका क्लिकवर मिळणार दीड हजार स्वच्छतागृहांची माहिती...

ठळक मुद्देमहापालिकेकडून हाय टेक सुविधा : एका क्लिकवर मिळणार दीड हजार स्वच्छतागृहांची माहिती

पुणे : आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे... मोबाईलमध्ये हवी ती माहिती गुगलवर मिळते... आता याच गुगलच्या मॅप सुविधेचा महापालिकेने अभिनव वापर करण्यास सुरुवात केली आहे. रस्ते, त्यावरील वाहतूक कोंडी, हवी ती ठिकाणे शोधण्याची सुविधा असलेल्या गुगल मॅपवर आता स्वच्छता गृहे सुद्धा शोधता येणार आहेत. स्वच्छ भारत अभियानांतर्गत ही हायटेक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. शहरामध्ये महापालिकेची जवळपास दीड हजार स्वच्छता गृहे आहेत. स्वच्छ भारत मिशन स्वच्छतागृह (एसबीएम टॉयलेट) या सांकेतिक नावाने गुगल मॅपवर ही स्वच्छता गृहे दिसणार आहेत. याचा फायदा शहरामध्ये नव्याने आलेल्या नागरिकांना अथवा अपरिचित भागात गेल्यावर नागरिकांना होणार आहे. पालिकेच्या दीड हजार स्वच्छतागृहांचा वापर नागरिकांकडून केला जातो. यातील बरीचशी स्वच्छतागृहे मुख्य रस्त्यावर आहेत, तर बरीचशी गल्लीबोळातही आहेत. मुख्य रस्त्यावरील स्वच्छतागृहे नागरिकांना सापडतात. मात्र, आतील भागात असलेली स्वच्छतागृहे शोधणे अडचणीचे असते. पालिकेने या पूर्वीच स्वच्छतागृहांची माहिती तसेच ठिकाण दर्शविणारे फलक लावले आहेत. परंतू, आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन पालिकेने स्वच्छतागृहांचे लोकेशनच थेट आपल्या बोटांवर आणून ठेवले आहे. गुगल मॅपवर जाऊन पाहिल्यास जागोजाग एसबीएम टॉयलेट असे संकेतचिन्ह दिसू लागते. महिला, पुरुषांसाठी असलेली स्वतंत्र स्वच्छतागृहेही सांकेतिक चिन्हांद्वारे दर्शविली जात आहेत. त्यामुळे अन्य कोणतीही गोष्ट शोधताना स्वच्छतागृह शोधणेही सोपे झाले आहे. ===   गेल्या काही वर्षात रस्ते, वास्तू, हॉटेल्स, दुकाने आवश्यक गोष्टी शोधण्यासाठी गुगल मॅपचा वापर वाढला आहे. नागरिकांकडून अगदी सहज त्याचा वापर केला जात आहे. याच गुगल मॅपचा वापर करुन स्वच्छता गृह शोधण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून नागरिकांना त्याचा लाभ होणार आहे. स्वच्छतागृहांकडे जाण्यासाठीचा रस्ता, त्याचे अंतर आणि दिशा याची माहितीही नकाशासह या मॅपवर दर्शविण्यात येते. - ज्ञानेश्वर मोळक, प्रमुख, घनकचरा व्यवस्थापन

टॅग्स :Puneपुणेgoogleगुगलdigitalडिजिटल