पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदासाठी शुक्रवारी (दि. ३१) निवडणूक होत असून, ज्येष्ठ नगरसेविका सीमा सावळे यांचा एकमेव उमेदवारीअर्ज दाखल असल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे. निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. दुपारी बाराला निवडणूक प्रक्रियेस सुरुवात होणार आहे. साखर आयुक्त डॉ. बिपीन शर्मा पीठासन अधिकारी असतील. दरम्यान, १६ सदस्यीय स्थायी समितीत भाजपाच्या १०, तर भाजपसंलग्न १ अपक्षाचा समावेश असल्याने सावळे यांची निवड निश्चित समजली जात आहे. त्यावर केवळ शुक्रवारी शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. (प्रतिनिधी)
स्थायी अध्यक्षांची आज निवड
By admin | Updated: March 31, 2017 02:57 IST