शहरं
Join us  
Trending Stories
1
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
3
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
4
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
5
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
6
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
7
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
8
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
9
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
10
नागपंचमी २०२५: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
11
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
12
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
13
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
14
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
15
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...
16
नवीन कर प्रणालीतही टॅक्स वाचवता येतो! NPS, EPF पासून ते 'या' खास पर्यायांपर्यंत, बचत करण्याचे ७ प्रभावी मार्ग!
17
रायगड बोट दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या ३ मच्छिमारांचे मृतदेह सापडले!
18
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
19
गुंतवणुकीसाठी बेस्ट आहे 'ही' सरकारी स्कीम; एकदा गुंतवणूक करा आणि दरवर्षी मिळवा २ लाखांचं फिक्स व्याज
20
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल

Corona virus pune : प्रशासनाने आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा; पुणे व्यापारी महासंघाचा संचारबंदीच्या निर्णयाला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 19:10 IST

व्यापारी वर्गाला सकाळी १० ते रात्री ९ दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी द्या व्यापाऱ्यांची मागणी

ठळक मुद्देदिवसा कोणाला कोरोना होणार नाही का? रांका यांचा सरकारला सवाल

पुणे : मागील वर्षी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमधून अद्यापही व्यापारी वर्ग पूर्णपणे सावरलेला नाही. त्यातच आता पुन्हा एकदा शहरात दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. सकाळी ६ ते सायंकाळी ६ पर्यंतच दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेले व्यावसायिक पुन्हा एकदा कात्रीत सापडले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या नवीन नियमावलीला विरोध दर्शविला आहे. तसेेेच आपल्या निर्णयावर फेरविचार करत व्यापारी वर्गाला सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत खुले ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी केली आहे. 

पुण्यात पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कोरोनाचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. या वेळी पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, या निर्बंधांना विरोध होताना दिसत आहे. प्रशासनाच्या या भूमिकेविरोधात व्यापारी वर्गाने उघड उघड नाराजी व्यक्त केली आहे. 

रांका म्हणाले; आधी राज्य सरकारने रात्री आठ ते सकाळी सातपर्यंत संचारबंदी लागू केली होती. त्यावेळी व्यापारी संघाने सरकारच्या या निर्णयाला विरोध न करता पूर्णपणे सहकार्य केले. पण आता ही वेळ आणखी कमी करण्यात आल्यामुळे आम्ही व्यापारी वर्ग या निर्णयाचा निषेध व्यक्त करत आहोत.

रांका म्हणाले, आधीच्या निर्णयावर पुणे व्यापारी महासंघाने एक तास वेळ वाढवून मागितली होती. त्यावर काही चर्चा झाली नाही. त्यानंतर नवीन नियमावली जाहीर होण्याअगोदर प्रशासनाने व्यापारी प्रतिनिधींशी बोलणे गरजेचे होते. व्यापारी आणि जनतेची मत न घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. सकाळी सहा वाजता दुकाने उघडणे अशक्य आहे असेही रांका म्हणाले.

शहरात सकाळी ११ शिवाय कोणत्याही बाजारपेठ उघडत नाही. मात्र,सायंकाळी ६ वाजता बंद करावे लागणार आहे. या वेळेत कितपत व्यवसाय होणार हा प्रश्न आहे.

सण उत्सवांवर होणार परिणाम....महाराष्ट्रात गुढीपाडवा सण उत्साहात साजरा केला जातो. १३ एप्रिलला गुढीपाडवा आहे. नवीन वर्षाची सुरुवात करून देणाऱ्या या सणाला आता विरजण आले आहे. मागच्या वर्षीही हा सण उत्साहात साजरा करता आला नाही.

व्यापारी वर्गाला सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत खुले ठेवण्याची परवानगी द्या

प्रशासनाने जनता आणि व्यापाऱ्यांचा विरोध लक्षात घेणे गरजेचे आहे. सायंकाळी ६ ते सकाळी ६ पर्यंतच्या संचारबंदीवर फेरविचार करावा. सर्व व्यापारी वर्गाला सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत खुले ठेवण्याची परवानगी द्यावी. अशी मागणीही रांका यांनी यावेळी केली आहे. 

    

टॅग्स :PuneपुणेCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याGovernmentसरकार