शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
2
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
3
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
4
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
5
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
6
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
7
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
8
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
9
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
10
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
11
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
12
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
13
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
14
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
15
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
16
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
17
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
18
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
19
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
20
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

चार खासदार असणाऱ्या शरद पवारांवर राजकीय निवृत्तीची वेळ

By admin | Updated: January 22, 2017 04:37 IST

राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे खासदार कधी पक्ष सोडतील याची शाश्वती नाही, लोकसभेत केवळ चार खासदार असणाऱ्या शरद पवार यांची राजकीय निवृत्तीची वेळ आली आहे.

बारामती : राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे खासदार कधी पक्ष सोडतील याची शाश्वती नाही, लोकसभेत केवळ चार खासदार असणाऱ्या शरद पवार यांची राजकीय निवृत्तीची वेळ आली आहे. पंतप्रधानांना बारामतीची एकच बाजू दाखवण्यात आली, त्यामुळे त्यांनी कौतुक केले. मात्र, सतत दुष्काळात असलेल्या अर्ध्या बारामतीची परिस्थिती वेगळीच आहे. बारामती तालुक्यातील पाण्याचा प्रश्न सोडवता आला नाही, ही वस्तुस्थिती देखील पुढे आली पाहिजे, अशी परखड टीका सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केली. बारामती तालुक्यातील कारखेल येथे आयोजित शेतकरी मेळाव्याच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना देशमुख यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते शरद पवार, अजित पवार यांच्यावर टीका केली. अर्ध्या बारामतीची जनता दुष्काळाने ग्रस्त आहे, असे असताना त्यांच्या कार्यकर्त्यांनी बोगस मतदान करून नेते तयार केले काय अशी शंका येते, अशीही टीका त्यांनी केली. अजित पवार यांच्या कार्यकाळात सिंचनावर ७० हजार कोटी रुपये खर्च झाले, परंतु बारामतीचा दुष्काळदेखील त्यांना हटवता आला नाही, यासारखे दुर्दैव नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. शरद पवार २००४ मध्ये पंतप्रधानपदाच्या शर्यतीत होते. ते शक्य झाले नाही. आता तर तशी परिस्थिती राहिलेली नाही. सध्या केवळ चार खासदार असलेल्या पवारांना निवृत्तीची वेळ आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारामतीचा दौरा केला. तो पवार यांच्या खासगी संस्थांचा. त्यांना बारामतीचा एक भाग दाखवण्यात आला. परंतु, उर्वरित बारामतीची स्थिती वेगळीच आहे. हे चित्रदेखील जगापुढे आले पाहिजे. त्यांच्या पक्षाच्या खासदारांची स्थिती देखील दोलायमान आहे. ते कधी पक्ष सोडतील, याची शाश्वती नाही, अशी टिप्पणीदेखील त्यांनी केली. यावेळी महात्मा फुले समता परिषदेच्या तालुकाध्यक्षांसह अन्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश करताना छगन भुजबळ यांना तुरुंगात डांबण्याची व्यवस्था राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच केली, असा आरोप केला. (प्रतिनिधी)