शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

'राम जन्मला ग' सखीचा सूर यंदा मात्र हरवला, कोरोना प्रादुभार्वामुळे रामनवमीचा उत्सव सलग दुसऱ्या वर्षी रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 17:38 IST

पुणे शहरातील काही भागात रामनवमी साधेपणाने साजरी

ठळक मुद्देकोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शहरातील सर्व धार्मिक स्थळ बंद

पुणे: 'राम जन्मला ग सखी राम जन्मला' चे हरवलेले सूर...ना आकर्षक विद्युत रोषणाई...ना भजन कीर्तनाने रंगणारा आसमंत...अशा वातावरणात सलग दुस-या वर्षी रामनवमी साधेपणाने साजरी करण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शहरातील सर्व धार्मिक स्थळ बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र रामनवमीनिमित्त अर्ध्या ते एक तासासाठी राममंदिरे उघडून रामजन्म सोहळा मंदिरांच्या विश्वस्तांच्या उपस्थितीत धार्मिक पद्धतीने पार पडला.

शहरामध्ये संचारबंदी लागू असल्याने हा अनुपम सोहळा भाविकांना ’याचि देही याचि डोळा’ अनुभवता आला नाही. शहरात गेल्या अनेक वर्षांपासून रामनवमी दिनी श्रीराम जन्मसोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.  मठ-मंदिरात भजन, कीर्तन, प्रवचन इत्यादी कार्यक्रमांनी भक्तीमय वातावरण निर्माण होते. काही ठिकाणी रामायण ग्रंथाचे वाचन, रामकथेचे निवेदन, गीत रामायणाचे गायन वगैरे कार्यक्रमही केले जातात. मात्र, यावर्षी साधेपणाने नवमी साजरी करण्यात आली. शहरातील सर्वांत जुन्या मंदिरांपैकी तुळशीबागेतील राम मंदिरा अडीचशे वर्षे जुने आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्यापासून रामनवमीनिमित्त मंदिरामध्ये रामनवमीचा उत्सव साजरा केला जातो. रामजन्मापूर्वी रामाला परिधान करण्यात येणाऱ्या पोषाखाची मिरवणूक काढण्याची परंपरा आहे. मुख्य पूजा आणि रामजन्म सोहळा झाल्यावर रामाच्या वस्त्राचा लाल रंगाचा तागा भाविकांना प्रसाद म्हणून वाटला जातो. करोना प्रादुभार्वामुळे रामनवमीचा उत्सव यंदा सलग दुसऱ्या वर्षी रद्द करण्यात आला. नागरिकांनी मंदिरांमध्ये दर्शनासाठी येणे टाळावे असे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे  मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत रामजन्म सोहळा साजरा झाल्याची माहिती श्री रामजी संस्थानचे विश्वस्त भरत तुळशीबागवाले यांनी ’लोकमत’ ला दिली.

दरम्यान, उपनगरांमध्यील राममंदिरांमध्ये रामजन्म सोहळा झाला. मंदिरांना फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. मंदिराबाहेरची मोहक रंगावली लक्ष वेधून घेत होती. मात्र पुण्यातील अन्य राम मंदिरांमध्येही रामनवमीचे कोणतेही कार्यक्रम झाले नाहीत. एकत्र येणे शक्य नसल्याने काही धार्मिक संस्थांनी ऑनलाईन कीर्तन आणि प्रवचनाचे कार्यक्रम आयोजित केल्याचे पाहायला मिळाले.

टॅग्स :PuneपुणेTempleमंदिर