शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
5
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
6
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
7
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
8
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
9
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
10
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
11
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
12
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
13
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
14
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
15
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
16
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
17
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
18
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
19
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
20
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...

टिळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या ‌‘पिक्सल्स्‌‍' एकांकिकेस पुरुषोत्तम करंडक

By विवेक भुसे | Updated: September 10, 2023 22:33 IST

सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिका ‘फेलसेफ'ला

श्रीकिसन काळे

पुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित ५८ व्या आंतर महाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेत टिळक आयुर्वेद महाविद्यालयाने सादर केलेल्या पिक्सल्स् एकांकिकेने बाजी मारत यंदाच्या पुरुषोत्तम करंडकावर आपले नाव कोरले. संघाला ५००१ रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. सर्वोकृष्ट प्रायोगिक एकांकिकेसाठी असलेले जयराम हर्डीकर स्मृतिचिन्ह व ५००१ रुपयांचे पारितोषिक मॉडर्न महाविद्यालयाने (गणेशखिंड) सादर केलेल्या ‘फेलसेफ' एकांकिकेने पटकाविले.

स्पर्धेतील सांघिक द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक हरी विनायक करंडक आणि ३००१ रुपयांचे रोख पारितोषिक स.प. महाविद्यालयाला (एकांकिका - कृष्णपक्ष) तर सांघिक तृतीय पारितोषिक संजीव करंडक आणि २००१ रुपयांचे पारितोषिक मराठवाडा मित्र मंडळाचे शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालयाला (एकांकिका रवायत - ए- विरासत) जाहीर करण्यात आले.

पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी शनिवार आणि रविवारी भरत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आली होती. प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीत पोहोचलेल्या नऊ संघाचे तीन सत्रात सादरीकरण झाले. स्पर्धेचा निकाल रविवारी रात्री जाहीर करण्यात आला.

सविस्तर निकाल :

सांघिक प्रथम : पिक्सल्स् (टिळक आयुर्वेद महाविद्यालय)सांघिक द्वितीय : कृष्णपक्ष (स. प. महाविद्यालय)

सांघिक तृतीय : रवायत - ए - विरासत (मराठवाडा मित्र मंडळाचे शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय)सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिका : फेलसेफ (मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंड)

सर्वोत्कृष्ट विद्यार्थी लेखक : समृद्धी भोसले आणि यशदा टेंबे (परत फिरा रे, झील अभियांत्रिकी महाविद्यालय)सर्वोत्कृष्ट विद्यार्थी प्रायोगिक लेखक : शिरीष कुलकर्णी (फेलसेफ, मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंड)

उत्तेजनार्थ विद्यार्थी लेखिका : आभा पटवर्धन आणि आर्या शिरसाठ (त्रिज्या, फर्ग्युसन कॉलेज, स्वायत्त)सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : अक्षय जाजू व सौरभ विजय (पिक्सल्स्, टिळक आयुर्वेद महाविद्यालय)

उत्तेजनार्थ दिग्दर्शन : श्रीरंग वैद्य (फेलसेफ, मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंड)उत्तेजनार्थ दिग्दर्शिका : श्रीनिधी झाड व शिरीन बर्वे (कृष्णपक्ष, स. प. महाविद्यालय)

सर्वोत्कृष्ट वैयक्तिक अभिनय नैपुण्य : कोणीही नाहीअभिनय नैपुण्य (अभिनेता) : इमरान तांबोळी (पाऊसपाड्या, पाऊसपाड्या, विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय)

अभिनय नैपुण्य (अभिनेत्री) : वैष्णवी चामले (आई (लता), पिक्सल्स, टिळक आयुर्वेद महाविद्यालय, पणे)वाचिक अभिनय नैपुण्य : कोणीही नाही

उत्तेजनार्थ (अंतिम फेरी) : मुकुल ढेकळे (रहीमचाचा, रवायत-ए-विरासत, मराठवाडा मित्र मंडळाचे शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय), गौरव पायुगडे (इख्तार, रवायत-ए-विरासत, मराठवाडा मित्र मंडळाचे शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय), साक्षी परदेशी (अक्का, (इंदू), मायबाप..?, आयएमसीसी), ऋषभ जैन (शेखर, मायबाप..!?, आयएमसीसी), रिद्धेश पाटील (रहीमचाचा, पिक्सल्स्, टिळक आयुर्वेद महाविद्यालय), अद्वय पुरकर (वासू, कृष्णपक्ष, स. प. महाविद्यालय), श्रीरंग वैद्य (आदेश इनामदार, फेलसेफ, मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंड), विजय पाटील (तात्या (संपत), पिक्सल्स्, टिळक आयुर्वेद महाविद्यालय), अभिषेक लवाटे (सोन्या, मायबाप..!?, आयएमसीसी), वैष्णवी जाधव (सुमन, पिक्सल्स्, टिळक आयुर्वेद महाविद्यालय).

सर्वोत्कृष्ट आयोजित संघ : भगीरथ करंडक : व्हीआयआयटी

दीपक रेगे, चंद्रशेखर कुलकर्णी, सुषमा सावरकर-जोग यांनी स्पर्धेचे परिक्षण केले.

गुरुवारी पारितोषिक वितरण समारंभ

स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ दि. १४ सप्टेबर रोजी भरत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आला आहे. अंतिम फेरीत पुरुषोत्तम करंडक पटकाविलेल्या पिक्सल्स या एकांकिकेचे सायंकाळी ५ वाजता सादरीकरण होणार असून त्यानंतर सायंकाळी ६:३० वाजता ज्येष्ठ रंगकर्मी आणि एशिया पॅसिफिक ऑफ इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटचे (आयटीआय-युनेस्को) उपाध्यक्ष विद्यानिधी वनारसे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होणार आहे.