पुणे : संभाजी उद्यानातील आबालवृद्धांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या मस्त्यालयाचे दर वाढवण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला आहे. नूतनीकरणामुळे दर वाढवत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. २ रूपयांवरून २० रूपये व १ रूपयांवरून १० रूपये असा दर प्रस्तावित करण्यात आला आहे. स्थायी समितीकडून यात कपात करून हा दर १० व ५ रूपये केला जाण्याची शक्यता आहे.गेल्या अनेक वर्षांपासून संभाजी उद्यानातील मत्स्यालय पुणेकरांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. सन १९५३ मध्ये त्याचे उद्घाटन करण्यात आले. मुंबईतील तारापोरवाला मस्त्यालयापासून त्याची प्रेरणा घेण्यात आली. लहान आकाराच्या काचेच्या पेट्यांमध्ये ठेवलेले रंगीत मासे पाहून मुले हरखून जातात. पेटीच्या बाहेर एका लहानशा पेटीवर त्यातील माशांची माहितीही दिलेली आहे. नेहमीच्या माशांशिवाय त्यात दुर्मिळ मासेही असल्यामुळे मुलांना त्याची माहिती मिळते.या मत्स्यालयाचे सन १९९४ मध्ये नूतनीकरण करण्यात आले. त्याआधी त्याचा दर प्रौढांसाठी १ रूपये व लहानांसाठी २० पैसे असा दर होता. तो सन १९४ मध्ये २ रूपये व १ रूपया करण्यात आला. आता परत या मत्स्यालयाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. त्यात पेटीतील लहान शार्कपासून ते भाग्यकारी समजल्या जाणार्या काही परदेशी जातीच्या माशांचाही समावेश आहे. तसेच आकर्षक छताबरोबरच जमीनही रंगीत व मुलांना आवडेल अशी करण्यात आली आहे.त्यामुळेच आता प्रशासनाने याचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रौढांसाठी तो २० रूपये व लहानांसाठी १० रूपये करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे. संभाजी उद्यान हे महापालिकेचे शहरातील बरेच जुने उद्यान आहे. तिथे अनेक पुणेकर मुलांसह येतजात असतात. त्यात पेठेत राहणार्या गरीब कुटुंबांचाही समावेश आहे. उद्यान हे काही महापालिकेचे नफा कमवण्याचे साधन नाही. त्यामुळे स्थायी समितीकडून हे दर कमी केले जाण्याची शक्यता आहे. ते प्रौढांसाठी १० रूपये व लहानांसाठी ५ रूपये केले जातील, असे दिसते आहे.
मासे पहायचेत?, मग द्या दहापट पैसे; संभाजी उद्यानात नूतनीकरणाच्या नावाखाली वाढीव बोजा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 00:50 IST
संभाजी उद्यानातील आबालवृद्धांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या मस्त्यालयाचे दर वाढवण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला आहे. नूतनीकरणामुळे दर वाढवत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मासे पहायचेत?, मग द्या दहापट पैसे; संभाजी उद्यानात नूतनीकरणाच्या नावाखाली वाढीव बोजा?
ठळक मुद्देनूतनीकरणामुळे दर वाढवत असल्याचे प्रशासनाकडून स्पष्टीकरणप्रौढांसाठी तो २० रूपये व लहानांसाठी १० रूपये करण्याचा स्थायी समितीसमोर प्रस्ताव