शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘मुलगी’ झाली म्हणून फेकले; पण तिला माणुसकीने तारले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 07:42 IST

जंगलातील काट्याकुट्यांच्या खाईत सापडले नवजात बाळ

- शैलेश काटेलोकमत न्यूज नेटवर्कइंदापूर (जि. पुणे) : कडाक्याच्या थंडीत रात्रीच्या अंधारात कुडकुडणारे अर्भक. दाेन तासांपूर्वी जन्मलेले हे बाळ आईनेच वनविभाग क्षेत्रातील कच्च्या रस्त्यालगतच्या चारीत काट्याकुट्यांत फेकून दिले; पण अखेर बचावले! एका वृद्धाने या अर्भकाला पाहिले आणि रडवेल्या डोळ्यांनी त्यांनी इतरांना सांगितले. त्यानंतर पोलिस कॉन्स्टेबल महिलेने तातडीने सूत्रे हलवली, म्हणूनच ती चिमुरडी आता जग पाहू शकते आहे!

रात्रीच्या वेळेस एका वृद्धाने बाळ कण्हल्याचा आवाज ऐकला. त्याने काही युवकांना बोलावले. युवक चारीकडे गेले. चारीत एका गोणपाटातून आवाज येत होता. उलगडून पाहिल्यानंतर हे अर्भक दिसले. सोबत वार व नाळही होती. नाळ जोडलेली असतानाच आईने तिला काट्याकुट्यांनी वेढलेल्या खाईत फेकून दिले होते. 

डोके, पाठ आणि सर्वांगाला चिमटे काटे अन् सराट्याचे काटे टोचलेले होते. माता-पित्याची क्रूरता थरकाप उडवणारी हाेती. वंशाला दिवा हवा असताना, मुलगी झाली म्हणून जन्मदात्यांनीच या ‘नकोशी’ला मृत्यूच्या खाईत फेकून दिले, असा प्राथमिक अंदाज आहे.

असा झाला उलगडाहवालदार माधुरी लडकत यांचा फोन आला. ‘बीजवडी वनविभागात एक स्त्री अर्भक आढळले आहे. लवकर या’, असे त्यांनी सांगितले. मी तत्काळ तेथे पोहोचलो. अवघ्या दोन तासांपूर्वी जन्मलेल्या मुलीला टाकून देणाऱ्या आईबद्दल अतीव कीव आणि संतापही आला. आम्ही आणलेली दूध पावडर, शाल, दुपट्टा बाळाला ऊब देईल; पण तिला खरी गरज आहे ती आईच्या कुशीची अन् दुधाची.- प्रशांत शिताप, सामाजिक कार्यकर्ते.

३ तास प्रयत्नांची पराकाष्ठाइंदापूर तालुक्यातील बीजवडी गावच्या हद्दीत शनिवारी (दि. १६) रात्री आठच्या सुमारास हे स्त्री अर्भक आढळले. पोलिस यंत्रणा, उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी तीन तास प्रयत्नांची पराकाष्ठा करीत तिला जीवदान दिले. ती सध्या सुखरूप असून, सोलापूरमध्ये उपचार सुरू आहेत. अज्ञात स्त्रीविरुद्ध बापू ज्ञानदेव पालवे या तरुणाने फिर्याद दिली आहे.