देऊळगावराजे : देऊळगावराजे (ता. दौंड)च्या पूर्व भागातील खोरवडी, आलेगाव, देऊळगावराजे, पेडगाव येथील बंधाऱ्यावरील ढापे अद्याप बसविलेले नसल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात पाणीगळती होत आहे. यामुळे परिसरातील रब्बी पिकांना पाणी कमी पडण्याची भीती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या बंधाऱ्यांवरील ढापे संबंधित विभागाने तत्काळ बसवावेत, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. पाटबंधारे विभागाच्या वतीने दर वर्षी पावसाळा संपल्यावर बंधाऱ्यावर ढापे बसवण्यात येतात. जुने ढापे बदलून नवीन ढापे बसविण्यात येतात. चालू वर्षी पाऊस समाधानकारक झाल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरले. परिणामी चालू वर्षी गहू, तूर, हरभरा, मका यांसह जनावरांसाठी हिरवा चारा पिके शेतकऱ्यांनी घेतली. परंतु, बुडीत बंधाऱ्यावर अद्याप ढापे बसविलेले नाहीत. त्यामुळे पाणी कमी पडण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. गेल्या वर्षी पाऊस कमी पडला; त्यामुळे उजनी धरण पूर्ण क्षमते भरले नाही.
जुन्या ढाप्यांमुळे गळती
By admin | Updated: February 15, 2017 01:46 IST