शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
4
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
5
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
6
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
7
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
8
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
10
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
11
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
12
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
13
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
14
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
15
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
16
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
17
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
18
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
20
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

भीमा नदीवरील बंधाऱ्याचा ढापा निखळला, हजारो लिटर पाण्याची गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 00:24 IST

खरपुडी येथील बंधारा पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे तसेच बंधा-याला बसवण्यात आलेले लोखंडी ढापे कमकुवत असल्यामुळे पाण्याचा दाब वाढून एक ढापा निखळला आहे. त्यातून लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे.

दावडी -  खरपुडी (ता. खेड) येथील भीमा नदीपात्रावरील कोल्हापूर बंधा-याचा एक ढापा निखळल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. याबाबत ‘लोकमत’ने काल (दि. ८) बातमी छापली होती. चासकमान धरणातून चार दिवसांपूर्वी भीमा नदीपात्रावरील कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे भरण्यासाठी पाणी सोडले होते. खरपुडी येथील बंधारा पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे तसेच बंधा-याला बसवण्यात आलेले लोखंडी ढापे कमकुवत असल्यामुळे पाण्याचा दाब वाढून एक ढापा निखळला आहे. त्यातून लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे.शुक्रवारी चासकमान धरणातून नदीपात्रात सोडलेले पाणी दुपारी बंद करण्यात आले. प्रशासनाने तातडीने याची दखल घेत खरपुडी बंधाºयाच्या तुटलेल्या ढाप्याची दुरुस्ती करण्यासाठी पाटबंधारे विभागाचे अधिकारी व कर्मचारी स्थानिक शेतकºयांच्या मदतीने या तुटलेल्या ढाप्याची दुरुस्ती करण्यासाठी सरसावले. मात्र, पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे हा प्रयत्न असफल ठरला. पाटबंधारे कर्मचारी व शेतकरी यांनी झाडाचा पाला तोडून पोत्यामध्ये भरून ही पोती तुटलेल्या ढाप्याजवळ टाकली. मात्र, पाण्याचा दाब जास्त असल्यामुळे त्यांनाही पाण्याने ओढून नेले.गेल्यावर्षी पाटबंधारे विभागाने या बंधाºयाला शंभर नवीन व जुने लोखंडी ढापे मिळून बसवण्यात आले होते. यंदा या पाटबंधारे विभागाला माहिती असूनही हलगर्जीपणामुळे पुन्हा तेच जीर्ण झालेले लोखंडी ढापे बसविण्यात आले. ढाप्यांची दुरुस्ती न केल्यास दोन दिवसांत हा बंधारा रिकामा होईल अशी शक्यता निवृत्ती गाडे, बाळासाहेब मांजरे, अशोक मांजरे, मनोहर मांजरे, संतोष मांजरे व लखन मांजरे यांनी व्यक्त केली.सायंकाळी पाणी केले बंदभीमा नदीपात्रावरील केदारेश्वर मंदिर, सिद्धेश्वर मंदिर, खरपुडी, वाटेकरवाडी व निमगाव येथील बंधारे चासकमान धरणातून पाणी सोडल्यामुळे तुडुंब भरून शेल-पिंपळगाव येथील धरणात पाणी पोहोचले आहे. त्यामुळे आज (दि. ९) संध्याकाळी चासकमान धरणातून सोडण्यात आलेले पाणी बंद करण्यात येणार आहे.या परिसरात कमी प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे दुष्काळाच्या झळा सुरू झाल्या आहेत. मागील वर्षी चासकमान धरणामध्ये डिसेंबर महिन्याअखेर १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध होता.यंदा मात्र कमी पावसामुळे धरणात सध्या ७९.७३ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यात चासकमान धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्यास पाण्याचे आवर्तन सुरू आहे. अजून सहा महिने उन्हाळ्याचे दिवस बाकी आहेत. त्यामुळे धरणातील पाण्याचे योग्य प्रकारे नियोजन करणे गरजेचे आहे. अशी जर पाण्याची नासाडी होत असेल तर पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे.खरपुडी येथील बंधारा पूर्ण क्षमतेने भरला आहे. मात्र कर्मचाºयांच्या हलगर्जीपणामुळे चांगल्या पद्धतीचे लोखंडी ढापे बंधाºयाच्या तळाशी लावणे गरजेचे होते. तसेच कमकुवत ढापे बसविल्यामुळे पाण्याचा दाब येऊन एक ढापा निखळला आहे. या ढाप्याची आजच दुरुस्ती करून गळती थांबविण्यात येणार आहे.- उत्तम राऊत, उपअभियंता,चासकमान पाटबंधारेविभाग खेड 

टॅग्स :PuneपुणेWaterपाणी