अनिल राजेंद्र लिंबोरे (वय २४, रा. शिवरी, ता. पुरंदर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अरूंधती ब्रम्हे यांनी काम पाहिले. त्यांनी चार साक्षीदार तपासले. त्यामध्ये प्रत्यक्षदर्शीची साक्ष महत्त्वाची ठरली. पुरंदर तालुक्यातील वाळूंज येथे घडलेल्या या प्रकाराबाबत १६ वर्षीय मुलीने जेजुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी विनयभंग आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता. पोलीस उपनिरीक्षक एन. एच. सोनवलकर यांनी या प्रकरणाचा तपास केला. संबंधित मुलगी महाविद्यालयातून घराकडे चालली होती. त्यावेळी "थांब तुझ्याशी बोलायचे आहे' असे म्हणत हात धरून तिचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. लिंबोरे याने दंड भरल्यास ती रक्कम पीडितेला देण्यात यावी. तर दंड न भरल्यास लिंबोरे याला तीन महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्याला तीन वर्षे सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:12 IST