शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

दुकानांतून कपडे चोरणाऱ्या तीन महिलांसह एकास लोणी काळभोर पोलिसांनी केले जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 18:19 IST

दुकानदाराने दाखवलेल्या समयसूचकतेमुळे विविध दुकानांतून कपडे चोरी करणाऱ्या तीन परप्रांतीय महिलांसह एक पुरुष अशा चार जणांच्या टोळीस लोणी काळभोर पोलिसांनी जेरबंद केले आहे.

ठळक मुद्देचार जणांच्या टोळीस लोणी काळभोर पोलिसांनी केले जेरबंद, रिक्षा जप्त६ हजार ५०० रुपये किमतीच्या १० साड्यांची चोरी केल्याची आरोपींनी दिली कबुली

लोणी काळभोर : दुकानदाराने दाखवलेल्या समयसूचकतेमुळे विविध दुकानांतून कपडे चोरी करणाऱ्या तीन परप्रांतीय महिलांसह एक पुरुष अशा चार जणांच्या टोळीस लोणी काळभोर पोलिसांनी जेरबंद केले आहे. ते चोरी करण्यासाठी वापरत असलेली रिक्षा जप्त करण्यात आली आहे.याप्रकरणी भरत पोपट गायकवाड (वय ३४, रा. कुंजीरवाडी, ता. हवेली) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रिक्षाचालक सर्फराज दत्तू गायकवाड (वय ३७, रा. मांजरी बुद्रुक, ता. हवेली), लक्ष्मीबाई दीपक जाधव (वय ४५), रेणुका शिवलाल पवार (वय ५०) व तायव्वा सिद्राम गायकवाड (वय ६०, तिघी सध्या रा. लमाण तांडा, येरवडा, पुणे, मूळ रा. हदरा, ता. दुधणी, जि. गुलबर्गा, कर्नाटक) यांना अटक करण्यात आली आहे.पोलीस निरीक्षक बंडोपंत कोंडुभैरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गायकवाड यांचे कुंजीरवाडी येथे पुणे-सोलापूर महामार्गालगत ए-वन टेलर व कलेक्शन नावाचे कपड्यांचे दुकान आहे. २६ डिसेंबर रोजी दुपारी ३-३० वाजण्याच्या सुमारास ते त्यांच्या दुकानासमोर असलेल्या चंद्रभागा काकडे यांच्या दुकानात गेले. त्या वेळी तीन महिला तेथे होत्या. काकडे यांना त्यांचा संशय आल्याने त्यांची मुलगी नीलम हिने एका महिलेची झडती घेतली. तिने साडीमध्ये एक सहावारी साडी लपवलेली आढळून आली. तिच्या ताब्यातून साडी घेतल्यानंतर त्या तिन्ही महिला दुकानाबाहेर पडल्या.या तिन्ही महिला चोरी करण्यासाठी आल्या होत्या, याची खात्री पटल्याने त्या कोठे जातात याची पाहणी करण्यासाठी गायकवाड व दुकानातील कर्मचारी रंगनाथ घोडके दोघे बाहेर आले. त्या वेळी बाहेर उभी असलेली रिक्षामध्ये (एमएच १२ बीडी ५९६५) बसून त्या तिघी पुणे बाजूकडे निघाल्याचे दिसले. गायकवाड व घोडके त्यांच्यामागे आले. रिक्षा थेऊर फाटा येथील भावना चौधरी यांच्या दुकानासमोर थांबली. तिन्ही महिला दुकानात गेल्या. या वेळी गायकवाड यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक गणेश पिंगुवाले यांच्याशी संपर्क साधून हा प्रकार सांगितला. काही वेळातच ते पोलीस हवालदार रवींद्र गोसावी, सोनवणे यांच्यासह तेथे पोचले. दुकानातील तीन महिलांसह रिक्षाचालकास ताब्यात घेतले.पोलिसांनी केलेल्या चौकशीत यापूर्वी ३० आॅक्टोबर रोजी गायकवाड यांच्या दुकानातून २० हजार रुपये किमतीचे रेमंड कंपनीचे पॅन्टचे दोन तागे, तप चौधरी यांच्या दुकानातून ६ हजार ५०० रुपये किमतीच्या १० साड्यांची चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली आहे.

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरBandopant Kondubhairiबंडोपंत कोंडूभैरीPuneपुणे