शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

कात्रज उद्यानाच्या स्वच्छतेचे तीनतेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 02:16 IST

राजीव गांधी प्राणिसंग्रहालय : दारूच्या बाटल्या, फुटके पाईप; भटक्या कुत्र्यांचा वावर

प्रिती जाधव-ओझापुणे : एकीकडे संपूर्ण देशभर स्वच्छता अभियान राबवून शहरेच्या शहरे नव्या जोमाने कामाला लागली आहेत. त्याचबरोबर राज्य शासन, केंद्र सरकारही यासाठी करोडो रुपये खर्च करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळते. मात्र, राजीव गांधी प्राणिसंग्रहालयालगत असलेल्या स्वच्छतागृहांचे मात्र याउलट चित्र पाहावयास मिळत असून, पालिकेच्या स्वच्छतागृहांची बिकट अवस्था झाली आहे.

सातारा रस्त्यावरील सर्वपरिचित असलेल्या राजीव गांधी प्राणिसंग्रहालय या पर्यटनस्थळाला पर्यटकांची मोठी पसंती असल्याने तेथे दर वर्षी लाखो पर्यटक येतात. परंतु, संग्रहालयाजवळ असलेल्या महापालिकेच्या सार्वजनिक स्वच्छतागृहांची देखभाल केली जात नसल्याचे वास्तव चित्र असून, तेथे दुर्गंधीचे व घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. केवळ देखभाल-दुरुस्तीअभावी येथील सार्वजनिक स्वच्छतागृहाची मोठी दुरवस्था झाली असून पर्यटकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सार्वजनिक स्वच्छता हे सार्वजनिक आरोग्याचे एक महत्त्वाचे अंग आहे. या प्रेक्षणीय स्थळावर पर्यटकांसाठी महापालिकेचा गाडीतळ आहे. त्यालागतच पुरुष व महिलांसाठी स्वच्छतागृहदेखील आहे. पालिकेने बांधलेली ही शौचालये रिकाम्या काचेच्या बाटल्या व तुटलेले पाईप या अस्वच्छतेच्या विळख्यात वेढली गेली आहेत. येथील स्वछतागृहामध्ये भटक्या कुत्र्यांचे साम्राज्य असते. रात्रीच्या काळोखात ही भटकी कुत्री एखाद्या पर्यटकावर हल्ला करतील की काय, या भीतीमुळे पर्यटक या शौचालयांचा वापर करण्याचे टाळतात. ही दोन्ही शौचालये वापरासाठी सुरक्षित म्हणजे यांच्या स्वच्छतागृहातील लाईटचे दिवे लावण्यात यावेत, जेणेकरून जनावरांचा धोका टाळता येईल, अशी मागणी पर्यटकांकडून होत आहे.स्वच्छतागृहांची अवस्था1 अपुऱ्या स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था, पुरेशा स्वच्छतेचा अभाव शहर व उपनगरामध्ये असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. स्वच्छतागृह नाही, त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरुस्ती महापालिकेने करणे गरजेचे आहे. यासाठी महापालिकेचे कर्मचारी ही स्वच्छतागृहे पर्यटकांसाठी सुरक्षित व वापरण्यायोग्य करणार का, असा प्रश्न येथे येणारे पर्यटक विचारत आहेत.2 या ठिकाणी असलेल्या स्वच्छतागृहांची संख्या अपुरी आणि अस्तित्वात असलेल्या स्वच्छतागृहांची स्वच्छता व्यवस्थित होताना दिसत नाही. हात धुण्यासाठी असलेल्या वॉशबेसिनचे पाईप तुटलेल्या अवस्थेत असून त्याचे पाणी खाली जमिनीवर पडत असल्याने पाय घसरून पडल्याचे अनेकांनी सांगितले. लघुशंका करण्यासाठी गेल्यानंतर तेथे पाणी सोडण्याची सुविधा नसल्याचेही आढळून आले. त्यामुळे या परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरल्याचे आढळून आले आहे. 

टॅग्स :Puneपुणेkatrajकात्रज