शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

चेन्नईतील ३ विद्यार्थी पुण्यातील धरणात बुडाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 01:34 IST

उन्हाळी शिबिर बेतले जिवावर : निष्काळजी आयोजक, शिक्षकांवर गुन्हा दाखल

पौड (जि. पुणे) : कातरखडक (ता. मुळशी) येथे चेन्नईहून उन्हाळी शिबिरासाठी आलेले तीन विद्यार्थी धरणात बुडाल्याची घटना बुधवारी घडली. २० तासांच्या शोधमोहिमेनंतर गुरुवारी दुपारी तिघांचेही मृतदेह सापडले असून ते नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. डॅनिश राजा (वय १३), संतोष के. (वय १३), सर्वान्ना (वय १३) अशी मृतांची नावे आहेत.आयोजक, शाळा आणि शिक्षकांच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याची तक्रार मृत विद्यार्थ्यांच्या नातेवाईक आणि स्थानिक पोलीस पाटील यांनी केली. त्यावरून विद्यार्थ्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी शिबिराचे आयोजक ‘टीच फॉर इंडिया’ ही संस्था, चेन्नईतील एसीएस मॅट्रिक्युलेशन शाळेचे शिक्षक, ‘जॅकलीन स्कूल आॅफ थॉट’चे स्थानिक संचालक आणि प्रशिक्षक अशा चौघांविरोधात पौड पोलीस स्टेशनमध्ये गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला.येथील जॅकलीन स्कूल आॅफ थॉट या संस्थेमध्ये ‘टीच फॉर इंडिया’ या संस्थेच्या माध्यमाने आयोजित उन्हाळी शिबिरासाठी चेन्नई येथील एसीएस मॅट्रिक्युलेशन शाळेची १३ ते १५ वयोगटातील २० मुले मंगळवारी (दि. २४) मध्यरात्री आली होती. हे शिबिर ८ दिवस येथे घेण्यात येणार होते. यामध्ये १२ मुले व ८ मुली होत्या. त्यांच्यासोबत एक शिक्षक तर तीन शिक्षिका होत्या. या मुलांच्या निवास व भोजनाची व्यवस्था कातरखडकचे उपसरपंच शंकर दशरथ चव्हाण यांच्याकडे केली होती.दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सहाच्या सुमारास अरुण नावाच्या शिक्षकासमवेत काही मुले पाण्यात उतरली. यापैकी कुणालाच पोहता येत नव्हते. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने डॅनिश राजा, संतोष के. सर्वान्ना बुडाले. मुले व शिक्षकांनी आरडाओरडा करून ग्रामस्थांना बोलावले. त्यात डॅनिश राजा याचा ताबडतोब शोध लागला. परंतु वेळीच उपचार न मिळाल्याने रुग्णालयात घेऊन जाताना त्याचा मृत्यू झाला. काही वेळाने मुळशी तालुका आपत्ती व्यवस्थापन टीम दाखल झाली; परंतु, खोल पाणी व अंधार पडल्याने मृतदेह सापडले नाही. गुरुवारी दुपारी उर्वरित दोन्ही मृतदेह सापडले.शिक्षकाला पोहता येत नसतानाही मुलांना पाण्यात का उतरू दिले?या घटनेने उन्हाळी शिबिरातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शिक्षकांना पोहता येत नसताना व धरणाच्या पाण्याचा अंदाज नसताना त्यांनी मुलांना पाण्यात का उतरू दिले, असा प्रश्न मृतांच्या नातेवाइकांनी केला.

टॅग्स :Damधरण