शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ शहरांमध्ये पुणे महापालिकेला 'थ्री स्टार' प्रमाणपत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 13:43 IST

स्पर्धेत नंबर घसरल्याने पालिकेने केले होते अपील

पुणे : केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत पुणे शहराचे मानांकन घसरलेल्या महापालिकेला दिलासा मिळाला असून स्वच्छ शहरांच्या यादीत पुण्याला 'थ्री स्टार' मानांकन मिळाले आहे. केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास खात्याचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. या मानांकनामुळे पालिकेला ऐन कोरोना काळात आनंददायी बातमी मिळाली आहे. 

स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेमध्ये महापालिकेचे मानांकन घसरून ते थेट ३७ व्या स्थानी गेले होते. पालिकेने या सर्वेक्षणासाठी शहरातील भिंती रंगविण्यापासून अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मोबाईल रिंगटोन बदलण्यापर्यंत सर्व गोष्टी केल्या होत्या. सार्वजनिक स्वच्छतेसोबतच जनजागृती, लोक प्रबोधन यावरही भर दिला होता. स्वच्छ सर्वेक्षणासाठी कोट्यावधीचा खर्च करण्यात आला होता. सल्लागाराची नेमणूकही करण्यात आली होती. सफाई कर्मचारी, घंटागाड्या, कचरा वाहनाऱ्या गाड्या, कचऱ्याचे व्यवस्थापन यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले होते. या स्पर्धेत १ लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आल्या ४२५ शहरांनी भाग घेतला. परंतु, केंद्रीय पथकाने केलेल्या पाहणीत पालिकेला कमी गुण मिळाले होते. शहराचे मानांकन ३७ वर घसरले होते. यावरून विरोधी पक्षांनी मुख्यसभेमध्ये प्रशासन आणि सत्ताधारी यांना धारेवर धरले होते. महापालिकेने केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास विभागाला पत्र पाठवीत सर्वेक्षणात त्रुटी असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. तसेच विश्लेषणात चुका झाल्याची शक्यताही वर्तविली होती. देशभरातून अशा ३८ पेक्षा अधिक शहरांनी अशाच स्वरूपाची पत्र पाठवीत सर्वेक्षणातील त्रुटी निदर्शनास आणून दिल्या होत्या. त्यावर केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास विभागाने पत्र पाठविलेल्या सर्व शहराच्या सर्वेक्षणाचा आढावा घेतला. तसेच त्याची पडताळणी केली. यामध्ये पालिकेला 'थ्री स्टार' रेटिंग मिळाले आहे. -------------सर्वेक्षणातील महत्वाचे मुद्दे१. शहरातील स्वच्छता२. ओढे - नाले स्वच्छता३. सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्वच्छता४. निवासी-व्यवसायिक संकुलांची स्वच्छता५. झोपडपट्टयांमधील स्वच्छता

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिका