पुणे : शहीद अमर शेख चौकातील होर्डिंग कोसळून चार जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी अटक केलेल्या ठेकेदार आणि रेल्वेच्या दोन कर्मचाऱ्यांचा मुुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.जुना बाजारजवळील शहीद अमर शेख चौकात ५ आॅक्टोबर रोजी होर्डिंग कोसळून ४ जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी रेल्वेचे अभियंते संजयसिंग विष्णुदेव आणि यांचे सहकारी पांडुरंग निवृत्ती वनारे; तसेच कॅप्शन अॅडव्हर्टायझिंग कंपनीचा मालक अब्दुल रज्जाक महम्मद खालीद फकिह यांना अटक केली होती. उच्च न्यायालयाने या तिघांना जामीन अर्ज मंजूर केला आहे.
होर्डिंगप्रकरणात तिघा जणांचा जामीन मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 02:49 IST