शहरं
Join us  
Trending Stories
1
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
2
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
3
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
4
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
5
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
6
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
7
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
8
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
9
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
10
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
11
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
12
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
13
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
14
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
15
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
16
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
17
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
18
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
19
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
20
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू

पुणे पालिकेच्या दवाखान्याचे तीन मजले आयपीडीच्या प्रतीक्षेत पडले धूळ खात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 13:19 IST

या चारमजली महापालिकेच्या दवाखान्याचे उद्घाटन २८ मार्च २०१६ रोजी करण्यात आले.

ठळक मुद्देवडगाव खुर्दमधील मुरलीधर लायगुडे दवाखाना चार मजल्यांच्या इमारतीमध्ये फक्त चालते ओपीडी

कल्याणराव आवताडे- पुणे : वडगाव खुर्द येथे राजयोग सोसायटी परिसरात कै. मुरलीधर पांडुरंग लायगुडे या नावाने पुणे महानगरपालिकेच्या वतीने तीन वर्षांपूर्वीच चारमजली दवाखाना सुरू करण्यात आला आहे. मात्र उद्घाटन होऊन तीन वर्षे झाली तरी या दवाखान्यात फक्त बाहयरुग्ण (ओ.पी.डी) विभागच सुरू असून, अद्यापपर्यंत या ठिकाणी आंतररुग्ण विभाग (आय. पी. डी.) सुरु करण्यात आलेला नसल्यामुळे परिसरातील रुग्णांना नाइलाजास्तव खासगी दवाखान्यात जावे लागत आहे. या चारमजली महापालिकेच्या दवाखान्याचे उद्घाटन २८ मार्च २०१६ रोजी करण्यात आले. परंतु सध्या येथे फक्त ओपीडीच चालू असल्याने रुग्णांना अ‍ॅडमिट करता येत नाही. सध्या पहिल्या मजल्यावर असलेल्या या बाह्यरुग्ण विभागात एक एमबीबीएस डॉक्टर, एक फार्मसी, एक नर्सिंग ऑर्डरली, एक सुरक्षारक्षक असा मिळून चार लोकांचा स्टाफ आहे. परंतु याच इमारतीच्या दुसºया व तिसºया मजल्यावर आंतररुग्ण विभाग करण्याचे योजिले होते. चौथ्या मजल्यावर स्टाफला राहण्यासाठी सोय करण्यात आली आहे. मात्र महापालिकेच्या दुर्लक्षामुळे आत्तापर्यंत या ठिकाणी हा विभाग सुरु न झाल्याचे दिसून येते. बरीच कामे अपूर्ण असल्याने हे वरील तीनही मजले रिकामे असल्याने धूळ खात पडले आहे.  मुळात ह्या परिसरात मध्यमवर्गीय लोकवस्ती जास्त असल्याने महापालिकेच्या दवाखान्यात येणाºया रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. एवढ्या मोठ्या इमारतीत सर्व सोयीसुविधायुक्त आंतररुग्ण विभाग नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्येस तोंड द्यावे लागत आहे. सध्या महापालिकेच्या या दवाखान्यात रोज पन्नासच्या आसपास रुग्ण येतात; मात्र ओपीडी विभागात त्यांची तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार केला जातो. मात्र अ‍ॅडमिट करण्यासाठी खासगी दवाखान्यात जावे लागत आहे. ..........या महानगरपालिकेच्या दवाखान्यात परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी सध्या बाह्यरुग्ण विभाग सुरु असून, अत्याधुनिक पद्धतीचा आंतररुग्ण विभाग लवकरात लवकर सुरू करावा, यासाठी संबंधित महापालिकेच्या अधिकाºयांना सूचना दिल्या असून, लवकरच सर्वसोयींयुक्त महापालिकेचा दवाखाना नागरिकांच्या सेवेस असेल. - राजाभाऊ लायगुडे, नगरसेवक...........सदर महापालिकेच्या दवाखान्यात दुसऱ्या मजल्यावर प्रसूती गृह (मॅटर्निटी होम) सुरू करावयाचे असून, याकरिता लागणारे तज्ज्ञ डॉक्टर व कर्मचारी वर्ग यांची कंत्राटी पद्धतीवर भरती प्रक्रिया सुरू असून, तसेच सोनोग्राफी व इतर सर्व सुविधा येथे सुरु करण्यात येणार आहे. येत्या दोन महिन्यांत सर्व सोयीसुविधायुक्त आंतररुग्ण विभाग सुरू करण्यात येईल.- डॉ. रामचंद्र हंकारे, आरोग्य विभागप्रमुख, पुणे मनपा ...........सध्या फक्त बाह्यरुग्ण विभाग सुरु असून, महापालिकेच्या नियमानुसार दोन दिवसांच्या औषधांसाठी पाच रुपये, तर चार दिवसांच्या औषधांसाठी दहा रुपये केसपेपर फी म्हणून घेतली जात असून, याचा लाभ परिसरातील तसेच दूरवरून येणाऱ्या सर्वच वर्गातील नागरिकांना होत आहे.  - डॉ. शुभांगी शाह, वैद्यकीय अधिकारी, कै. मुरलीधर पांडुरंग लायगुडे दवाखाना 

कै. मुरलीधर पांडुरंग लायगुडे या महापालिकेच्या दवाखान्यात सध्या फक्त ओपीडी विभाग सुरु आहे. मात्र पेशंट दाखल करावयाचा असेल तर खासगी रुग्णालयात जावे लागत असल्याने महापालिकेने ह्याच दवाखान्यात त्वरित आंतररुग्ण विभाग सुरू करावा. - हरिश्चंद्र दांगट, माजी नगरसेवक 

टॅग्स :Puneपुणेhospitalहॉस्पिटलPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका