पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार संबंधीत पीडित अल्पवयीन मुलगी घरी जात असताना सौरभ व करण यांनी तिला अडवून जवळच्या शेतात जबरदस्तीने नेले व तिच्यावर दोघांनीही बलात्कार केला. करण याने तिचे विवस्त्र अवस्थेतील फोटो मोबाईलमध्ये काढले. हा कार कोणाला सांगितल्यास तीचे छायाचित्र सोशल मिडीयात व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर हे दोघे तिथून आदित्यच्या दुचाकीवर बसून पसार झाले. याप्रकरणी संबधीत पीडितेने जुन्नर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, पोलीस निरीक्षक विकास जाधव, पोलीस कर्मचारी सागर हिले, अनिल लोहकरे, सुधीर काठे आदींनी तातडीने कारवाई करून या यातील दोन आरोपींना अटक केली. या प्रकरणाचा तपास उपअधीक्षक मंदार जवळे करत आहेत
--