शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीनंतरही किंमत कमी केली नसेल तर मला सांगा, मी तिथे येईल; निर्मला सीतारामन यांचे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."
3
२२ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल
4
Thane: गणपती विसर्जन करताना पाच जण नदीत बुडाले, एकाचा मृतदेह मिळाला; दोघांचा शोध सुरूच
5
Ganpati Visarjan: भर पावसात, जल्लोषात गणरायाला निरोप; मुंबईत ढोल-ताशांसह गुलालाची उधळण
6
ट्रम्प यांचा यु-टर्न! टॅरिफ पद्धतीत केले बदल; महत्त्वाची खनिजे व औषधी उत्पादनांसह काही वस्तूंना सूट
7
आजचे राशीभविष्य - ७ सप्टेंबर २०२५, नवीन कामाची सुरूवात करण्यास अनुकूल दिवस
8
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
9
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
10
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
11
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
12
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
13
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
14
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
15
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
16
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
17
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
18
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
19
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
20
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!

अनिकेत शिंदे खूनप्रकरणी तिघांना अटक, मुख्य सूत्रधारासह पाच जण फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2018 21:11 IST

अनिकेत संदीप शिंदे या शाळकरी मुलाच्या खून प्रकरणी चाकण येथील तीन जणांना पोलिसांनी अटक केली असून, मुख्य सूत्रधारासह पाच जण फरार झाले आहेत.

चाकण : अनिकेत संदीप शिंदे या शाळकरी मुलाच्या खून प्रकरणी चाकण येथील तीन जणांना पोलिसांनी अटक केली असून मुख्य सूत्रधारासह पाच जण फरार झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील संग्रामदुर्ग भुईकोट किल्ल्याच्या आवारात गुरुवारी ( १५ ) रोजी पूर्ववैमनस्यातून एका सोळा वर्षाच्या शाळकरी मुलावर लोखंडी कोयत्याने वार करून व डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याप्रकरणी चाकण येथील आठ तरुणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी किरण फकिरा धनवटे ( वय २३, रा. देशमुख आळी, चाकण ), तेजस दीपक रेपाळे ( वय १९, रा. शिवम रेसिडेन्सी, बी विंग, फ्लॅट नं. ११, चाकण ) व परेश उर्फ प्रवीण ईश्वर गुंडानी ( वय २६, रा. मार्केट यार्ड, शिक्षक कॉलनी, कांडगे वस्ती, चाकण ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.यातील मुख्य सूत्रधार ओंकार मच्छिन्द्र झगडे याच्यासह पप्पू धनवटे, नितीन पंचरास, वृषभ देशमुख व महिंद्र ससाणे ( सर्व रा. चाकण, ता.खेड, जि.पुणे ) हे पाचजण फरार झाले आहेत. चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १६६/२०१८ भादंवि कलम ३०२, ३०७, १४३, १४७, १४९, ५०४, ५०६, आर्म अक्ट कलम ३ (१)(२५), ४ (२५), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कायदा कलम ७ प्रमाणे आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिकेत संदीप शिंदे ( वय १६, रा. पानसरे मळा, शिक्रापूर रोड, चाकण, ता.खेड, जि. पुणे ) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला ओंकार मनोज बिसनाळे ( वय १७, रा. पोस्ट ऑफिस शेजारी, चाकण ) याने याबाबतची फिर्याद दिली आहे. त्याच्यावर येथील येथील जयहिंद हॉस्पिटल मध्ये उपचार चालू आहेत. काल रात्री ११ वाजून ९ मिनिटांनी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार, सहाय्यक फौजदार दत्ता जाधव, पोलीस नाईक सतीश जाधव, अनिल गोरड, हवालदार नवनाथ खेडकर व होमगार्ड सातकर यांच्या पथकाने शेलपिंपळगाव परिसरात लपून बसलेल्या वरील तीन आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली. वरील गुन्ह्यातील आरोपी ओंकार झगडे व किरण धनवटे यांच्यासह नऊ जणांवर २९ मे २०१५ रोजी रिव्हॉल्वर, तलवार, जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल असून मंडोरा ज्वेलर्स वर दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना विशाल रेसिडेन्सी मधून हत्यारांसह अटक झाली होती.

टॅग्स :Puneपुणे