शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

महिला एजंटकडून साडेतीन लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 16:11 IST

येरवडा येथील टपाल कार्यालयात महिला प्रधान क्षेत्रीय बचत योजनेच्या एजंट आहे. खातेदारांच्या खात्यात पैसे न भरता एकूण ३ लाख ५१ हजार ५५० रुपयांचा अपहार केला़.

ठळक मुद्देसंगीता अनंत निकम असे या महिला एजंटचे नाव आहे़. टपाल खात्याच्या पश्चिम विभागाकडून या खात्यांची तपासणी करत असताना या ४५ खात्यात पैसे भरले नसल्याचे उघड झाले़.

पुणे : अल्पबचत खात्यातील ४५ खातेदारांकडून पैसे घेऊन ते त्यांच्या खात्यात पैसे न भरता साडेतीन लाख रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़.याप्रकरणी येरवडा पोलिसांनी बचत योजनेच्या महिला एजंटविरोधात गुन्हा दाखल केला आहे़.संगीता अनंत निकम (रा़ बापूजी बुवा मंदिर, कळस, विश्रांतवाडी) असे या महिला एजंटचे नाव आहे़. याप्रकरणी पुणे शहर पश्चिम विभागाच्या डाकघर सहायक अधीक्षक अंजु शर्मा (वय ३९, रा़ चंदननगर, खराडी) यांनी येरवडा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. हा प्रकार डिसेंबर २०११ ते डिसेंबर २०१६ दरम्यान घडला आहे़. संगीता निकम या येरवडा येथील टपाल कार्यालयात महिला प्रधान क्षेत्रीय बचत योजनेच्या एजंट आहे. त्यांच्याकडे असलेल्या महिलांच्या बचत खात्याचे पैसे त्या दरमहा गोळा करुन खात्यात भरत असत़. येरवडा टाऊनशिप टपाल कार्यालयात आवर्ती ठेव योजनेत ४५ जणांचे खाते आहे़. निकम यांनी डिसेंबर २०११ ते डिसेंबर २०१६ या काळात त्यांच्याकडून दरमहा पैसे गोळा केला़ परंतु, त्यांच्या खात्यात भरले नाही़ असे एकूण ३ लाख ५१ हजार ५५० रुपयांचा अपहार केला़.टपाल खात्याच्या पश्चिम विभागाकडून या खात्यांची तपासणी करीत असताना या ४५ खात्यात पैसे भरले नसल्याचे उघड झाले़. त्यानंतर पश्चिम विभागाच्या सहायक अधिक्षक अंजु शर्मा यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़. संगीता निकम यांनी खात्यात पैसे भरले नसल्याचे लक्षात आल्यावर लोकांनी टपाल कार्यालयाकडे चौकशी केली़. या तक्रारींची दखल घेऊन टपाल खात्याने खात्याअंतर्गत चौकशी केली़ त्यात निकम यांनीच हे पैसे भरले नसल्याचे स्पष्ट झाल्यावर टपाल खात्याने त्यांच्याकडून व्याजासह पैसे वसुल केले़ पण, त्यात गुन्हा होत असल्याने टपाल खात्याच्या वतीने तक्रार देण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले़. सहायक पोलीस निरीक्षक सुशिल बोबडे अधिक तपास करीत आहेत़.

टॅग्स :PuneपुणेWomenमहिलाPolice Stationपोलीस ठाणे