शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

थकित बिलाची मागणी करणाऱ्या व्यावसायिकाला बिल्डरकडून जीवे मारण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2019 23:10 IST

43 लाखांची मागणी करणाऱ्या व्यावसायिकाला विमाननगर येथील एका प्रसिद्ध बिल्डरने जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार नुकताच घडला.

विमाननगर - बांधकामाच्या साईडवर केलेल्या फॅब्रिकेशनच्या कामाचे थकित 43 लाखांची मागणी करणाऱ्या व्यावसायिकाला विमाननगर येथील एका प्रसिद्ध बिल्डरने जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार नुकताच घडला. वर्षभरापासून केलेल्या कामाचे 43 लाख रुपये बिल्डरने दिलेले नाहीत. त्याची मागणी करण्यासाठी गेलेल्या व्यावसायिकाला हात-पाय तोडून जीवे मारण्याची धमकी संबंधित बिल्डरने दिली आहे. विमानतळ पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यासाठी जात असताना पोलीस स्टेशनच्या आवारातच बिल्डरच्या साथीदारांनी तक्रार दिल्यावर जीवे मारण्याची धमकी दिली.या गंभीर प्रकरणी संबंधित व्यावसायिकाने थेट पोलीस आयुक्तांकडे शुक्रवार (दि.23)रोजी तक्रार अर्ज दाखल केली आहे. मात्र अद्याप पोलिसांनी देखील याबाबत कोणतीही दखल घेतलेली नाही. या गंभीर घटनेमुळे व्यावसायिक व त्याचे कुटुंबीय धास्तावलेले आहेत. स्थानिक पोलिसांची भूमिका देखील या प्रकारात संशयास्पद आहे. बिल्डर त्यांचा वकील व इतर साथीदार तसेच काही पोलिस देखील या प्रकरणात सहभागी आहेत.स्थानिक पोलिसांकडून मदत न मिळाल्यामुळे सदर व्यावसायिकाने थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रार अर्ज दाखल केली आहे. या प्रकरणी अद्याप पोलिसांनी देखील कोणतीही कारवाई केलेली नाही. या बिल्डरची दहशत बघता केलेल्या कामाचे पैसे मागणाऱ्या व्यावसायिकाला धमकावले जाते ही बाब गंभीर असून शहरातील व्यावसायिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.