शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

शिक्षकाला गोळ्या घालण्याची सावकारांची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 02:40 IST

दौंड तालुका सावकारीच्या विळख्यात अडकल्याच्या घटना दिवसेंदिवस पुढे येत आहेत. नुकतेच पैशाच्या वादातून एका पोलीस कर्मचा-याने केलेल्या गोळीबाराची घटना ताजी असताना आता एका शिक्षकाला सावकारांनी गोळ््या घालण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे.

दौंड : दौंड तालुका सावकारीच्या विळख्यात अडकल्याच्या घटना दिवसेंदिवस पुढे येत आहेत. नुकतेच पैशाच्या वादातून एका पोलीस कर्मचा-याने केलेल्या गोळीबाराची घटना ताजी असताना आता एका शिक्षकाला सावकारांनी गोळ््या घालण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे.आलेगाव (ता. दौंड) येथील आलेश्वर विद्यालयातील उपशिक्षक सुभाष भोसले (वय ४८) यांनी तशी तक्रार दिली आहे. यावरून दोन वेगवेगळ््या घटनेतील तीन बेकायदेशीर सावकारांना अटक करण्यात आली आहे.विष्णू चौैघुले, युवराज बंडगर (दोघेही रा. दौैंड), नवनाथ चव्हाण (रा. खोरवडी, ता. दौैंड) या तीन खासगी सावकारांना अटक करण्यात आली आहे.सुभाष भोसले (रा. हिंगणीबेर्डी, ता. दौैंड) या शिक्षकाने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की ८ जानेवारी २०१४ रोजी विष्णू चौैघुले आणि युवराज बंडगर या दोघांकडून मी १० टक्के व्याजाने ३ लाख रुपये घेतले होते.या व्यवहारापोटी माझी वडिलोपार्जित दोन एकर जमीन साठेखत म्हणून करुन घेतली. या व्यवहारापोटी चार लाख ९० हजार रुपये व्याजापोटी दिलेले आहेत. तरीदेखील ७ लाख रुपये येणेबाकी आहे, असे विष्णू चौैघुले आणि युवराज बंडगर या सावकाराने तगादा लावला. पैैसे दे, नाहीतर गोळ््या घालीन, अशी धमकी दिली असल्याची फिर्याद सुभाष भोसले यांनी दिली आहे.याच शिक्षकाने अन्य एक दुसरी फिर्याद दिली असून, नवनाथ चव्हाण, स्वाती चव्हाण (रा. खोरवडी,ता. दौैंड) यांच्याकडून १० टक्के व्याजाने १ लाख रुपये घेतले होते. आजपावेतो १ लाख ६८ हजार व्याज देऊनदेखील पुन्हा माझ्याकडे तीन लाख रुपये मागतात. पैैसे दिले नाहीतर जिवे मारण्याची धमकी देत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.सावकाराला कोठडीचे आदेशदौंड येथील खासगी सावकार आनंद जाधव (वय ४४, रा. गोवागल्ली, दौंड) याला बुधवार (दि. ३१) अटक करण्यात आली होती. त्याला दि. ५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्याच्या जवळील कागदपत्रे, वह्या तसेच अन्य काही लोकांना व्याजाने पैैसे दिले आहे की नाही, याची चौैकशी करण्यासाठी त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.पोलिसांच्या आवाहनावरून तक्रारदार येताहेत पुढेदौैंड पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी खासगी सावकारांच्याविरोधात तक्रार करण्याचे फ्लेक्सद्वारे तसेच वर्तमानपत्रातूनही आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार सुभाष भोसले या शिक्षकाने आवाहनाला प्रतिसाद देत खासगी सावकाराच्याविरोधात तक्रार दिली असून, यासह अन्य काही नागरिक तक्रार देण्यास पुढे येतील, असे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी सांगितले.

टॅग्स :Crimeगुन्हाPuneपुणे