शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

जीवे मारण्याच्या धमकीने भय वाटू लागलंय, कोरेगाव भीमा प्रकरणातील पीडितांची व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 20:23 IST

रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सणसवाडीतील रमा आठवले, कोरेगाव भीमा येथील जयदीप सकट, अंजना गायकवाड आदींनी आपली व्यथा मांडली.

ठळक मुद्देशासनाने पुनर्वसनाचे आश्वासन दिले. परंतु,कार्यवाही नाहीपुढील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार

पुणे : आम्हाला जीवे मारण्याचा प्रयत्न करून खैरलांजी करण्याचा डाव काही लोकांनी केला आहे. त्यांची मनमानी वाढली आहे.१ जानेवारी रोजी शौर्य दिनी कोरेगाव भीमा येथे येणाऱ्या दलित बांधवांना चहा पाणी का केले, याचा राग धरून त्रास देण्याचे काम सुरू आहे. गावातून हद्दपार व्हावे लागले असून सातत्याने मारून टाकण्याच्या धमक्यांनी भय वाटू लागल्याची भावना कोरेगाव भीमा हल्ल्यातील पीडितांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.    रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सणसवाडीतील रमा आठवले, कोरेगाव भीमा येथील जयदीप सकट, अंजना गायकवाड आदींनी आपली व्यथा मांडली. शासनाने पुनर्वसनाचे आश्वासन दिले. परंतु, त्याची पुढे काहीच कार्यवाही झाली नाही. गेल्या २५ वर्षांपासून सणसवाडी येथे राहणाऱ्या रमा आठवले यांना मारण्याच्या धमक्या येत असल्याचे यावेळी सांगितले. कोरेगाव भीमामधील तणाव वाढल्यानंतर दोन महिन्यांसाठी पिंपरी-चिंचवडला गेले. त्यानंतर आता चंदननगर येथे राहत आहे. १ जानेवारी रोजी शौर्यदिनी येणाऱ्या लोकांना चहापाणी करण्याची गरज काय होती, या प्रकरणाचा राग धरून विनाकारण त्रास दिला जात आहे. आमचे फॅब्रिकेटर्सचे दुकानदेखील जाळले आहे. मागील तीन महिन्यांपासून शासनाकडून कुठलीच मदत नसल्याची खंत आठवले यांनी व्यक्त केली.  तीन महिन्यांपासून पीडित कुटुंबे आपल्या गावापासून लांब आहेत. त्यांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी जिल्हा व राज्य प्रशासनाकडून कुठलीच कारवाई होत नसल्याने पुढील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून त्यांच्याकडे कोरेगाव भीमा हल्लाप्रकरण केस उच्च न्यायालयात दाखल करणे, त्या हल्ल्याचा तपास सीबीआयकडे सोपविणे, पुनर्वसनकरिता विशेष विभाग व अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे आदी मागण्यांचे निवेदन देणार असल्याचे राहुल डंबाळे यांनी सांगितले.  दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कोरेगाव भीमा येथे साजरी करणार असून यासाठी पोलिसांनी पूर्ण संरक्षण, आवश्यक त्या परवानग्या घेण्यासाठी शनिवारी युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा सुवर्णा डंबाळे, अश्विन दोडके यांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार आहेत. 

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस