शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पाटसला हजारो लिटर पाण्याचा अपव्यय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 02:01 IST

शासनाच्या उदासीन धोरणामुळे पाटस गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागल्याने दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे.

- मनोहर बोडखे पाटस : शासनाच्या उदासीन धोरणामुळे पाटस गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागल्याने दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. पाणी वाया जात असल्यामुळे पाण्याचा दाब कमी होत गावाला अपूर्ण स्वरूपाचा पाणीपुरवठा होत असल्याची वस्तुस्थिती आहे.पाटस ग्रामपंचायतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेला वेळोवेळी गळती बंद होण्यासंदर्भात लेखी स्वरुपात सूचना करूनदेखील याकडे प्राधिकरण विभागाने दुर्लक्ष केले आहे. सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता भविष्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, दररोज हजारो लिटर पाणी वाया जाणे हे कितपत योग्य आहे, असा प्रश्न निर्माण झालेला आहे.वरवंड (ता. दौंड) येथील तलावातून पाटस गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी पाणी सोडले जाते. हे पाणी पाटस येथील जलशुद्धीकरण केंद्रात येते आणि तेथून गावाला पाणीपुरवठा केला जातो.पाटस गावाच्या जवळील तामखडा येथून पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी गेलेली आहे. या जलवाहिनीला ठिकठिकाणी पाण्याची गळती लागल्याने २४ तास पाणी वाया जात आहे. परिणामी ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचलेले आहे. पाटस गावातील काही भागांत पाण्याची टंचाई असल्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. दुसरीकडे पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होऊन गळती झालेले पाण्याचे रुपांतर सांडपाण्यात होत आहे. तेव्हा शासनाने तातडीने जलवाहिनीची गळती काढून पाणीगळती थांबवणे काळाची गरज आहे.>योजना हस्तांतरितकेली नाहीपाटस गावाला पाणीपुरवठा करणारी योजना ग्रामपंचायतीकडे अद्याप लेखी स्वरुपात हस्तांतरित झालेली नाही. वरवंड ते पाटसदरम्यान जलवाहिनी आहे. या जलवाहिनीला काही ठिकाणी गळती लागली आहे. त्यामुळे पाणी वाया जात आहे. तेव्हा पाणीगळती थांबविण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला याबाबत लेखी स्वरुपात गेल्या वर्षापासून पाठपुरावा केला जात आहे. मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे.- वैैजयंता म्हस्के (सरपंच, पाटस)>योजना हस्तांतरित केलीवासुंदे पाणीपुरवठा योजना बंद आहे. तेव्हा या योजनेवर खर्च झालेला पैैसा वाया जाऊ नये, म्हणून तसेच पाटस हे मोठे गाव असल्यामुळे या योजनेचा फायदा पाटसला व्हावा, म्हणून योजनेच्या जलवाहिनीची डागडुजी करून तसेच जलशुद्धीकरण योजना सुरू करून ही योजना पाटस ग्रामपंचायतीला हस्तांतरित केली आहे. त्यामुळे या योजनेच्या देखभालीची योजना पाटस ग्रामपंचायतीकडे आहे. परिणामी ग्रामपंचायतीला तांत्रिक मदत करता आली तर ती आम्ही करू शकतो.- वैशाली आवटे, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण>पाण्याचा प्रवाह कमी होत आहेजलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागली आहे. यासंदर्भात परिस्थितीची पाहणी केली असून पाणी वाया जात आहे. त्यामुळे गावाला पाणीपुरवठा करताना पाण्याचा प्रवाह कमी होत असल्याची वस्तुस्थिती आहे.- विलास भापकर, ग्रामविस्तार अधिकारी, पाटस