शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

हजारो भाविकांनी अनुभवला देव- दानव युद्धाचा थरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 16:52 IST

पूर्वी शिवभक्त भानोबा देवाला तस्करांनी कपट करून मारले होते. एक दिवस माझ्यासाठीही तुम्हाला मरावं लागेल असा शाप त्यावेळी भानोबानं दिला होता...

ठळक मुद्देकोयाळी - भानोबाची : तीन दिवसीय उत्सव; आज समारोप  

खेड (शेलपिंपळ्गाव)  : ढोल ताशांचा गजर... भानोबा देवाचे मंदिराबाहेर आगमन...त्याक्षणी दानवांची युद्धाला सुरुवात... देवाच्या नजरेला नजर... आणि क्षणार्धात दानव मूर्च्छित होऊन जमिनीवर कोसळले... भानोबा देवाचा दानवांना स्पर्श... देवाचा गजर... आणि दानवांना संजीवनी मिळाली...                      ऐशी भानोबाची ख्याती !                    प्रतिवर्षी येती उत्सवासी !!                    भक्तिभावे पुजता त्यासी !                    दु:ख दैन्य निवारी !! कोयाळी - भानोबाची (ता. खेड) येथे हजारो भाविकांनी देव - दानव युद्धाचा असा थरार अनुभवला. भानोबा देवाच्या उत्सवानिमित्त कोयाळी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा हा दिन भानोबा प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो. पूर्वी शिवभक्त भानोबा देवाला तस्करांनी कपट करून मारले होते. एक दिवस माझ्यासाठीही तुम्हाला मरावं लागेल असा शाप त्यावेळी भानोबानं दिला होता. त्यामुळे भानोबा देवाच्या शापानुसार तस्करांना आजही देवाशी युध्द करावे लागत असल्याची सत्यस्थिती आहे.             श्री. भानोबाच्या स्वागतासाठी गावातील स्थानिक ग्रामस्थांनी जय्यत तयारी करून मोठ्या उत्साहात देवाचे स्वागत केले. यावेळी देवाच्या स्वागत सभारंभाला भाविकांची संख्या लक्षणीय होती. बुधवारी व गुरूवारी देव - दानावांमध्ये रंगलेले हे युद्ध स्वत: नयनांनी पाहण्यासाठी तसेच देवाच्या दर्शनासाठी दोन दिवसात हजारो भाविकांनी कोयाळीत हजेरी लावली. तत्पर्वी, आज पहाटे भानोबा देवाची विधिवत अभिषेक व पूजा करण्यात आली. त्यानंतर देवाचा पोवाडा घेण्यात आला. सकाळी साडे अकरा ते एक यावेळेत देव - दानव युद्ध झाले. दोन दिवसात एकूण १०७६ भाविकांनी युद्धात सहभाग घेतला होता. भानोबा देवाची महारती घेऊन देवाच्या दर्शनाला दर्शनबरीतून सुरुवात झाली. उत्सवात अखेरीस कुस्त्यांचा जंगी आखाडा घेण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील नामांकित मल्लांनी आखाड्यामध्ये सहभाग घेतला होता. उत्सवात मनोरंजन कार्याक्रमची मोठी रेलचेल ठेवण्यात आली होती.                   शुक्रवारी (दि. २९) सकाळी ६ ते ७ भानोबा देवाचा ओलांडा व देवाचे राहुटी मंदिरातून जन्मस्थ मंदिरात आगमन, त्यानंतर दुपारी ३ ते सायंकाळी ७ भानोबादेव आपल्या आजोळी प्रयाण करेल. त्यांनंतर कुसेगावकरांना भावपूर्ण निरोप दिला जाईल. दरम्यान भानोबाच्या तीन दिवसीय उत्सवात जिल्हा परिषद सदस्या निर्मला पानसरे, माजी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संजय मोहिते, उद्योजक राजेंद्र गायकवाड आदिंसह विविध राजकीय पक्षाच्या मुख्य पदाधिका?्यांनी हजेरी लावली.              तीन दिवसीय उत्सव पार पडण्यासाठी देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच सर्व ग्रामस्थांचे महत्वपूर्ण योगदान लाभले. यात्रेदरम्यान आळंदी पोलीस ठाण्याअंतर्गत सुमारे ९० कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

* देव आणि तस्कर या दिनाच्या प्रतिपदेला विशेष महत्व असल्याने संपूर्ण राज्यातून भानोबाचे भक्त या दिवशी उपवास करून कोयाळी येथे देवाबरोबर युद्ध खेळायला येत असतात. यावर्षी पहिल्या दिवशी ५२५ व दुसऱ्या दिवशी ५५१ जणांनी युद्धात सहभाग घेतला होता..

................

*  भानोबा देव मंदिराबाहेर पडल्यानंतर मानवरूपी दानवने आपल्या हातातील शस्त्र (काठी) देवासमोर फिरवून उड्या घेतल्या. मात्र देवाच्या नजरेला नजर पडल्यानंतर ते त्याक्षणी जमिनीवर पडले. दरम्यान त्यांना देवाचा स्पर्श देण्यात आला. त्यानंतर पडलेल्या तस्करांच्या कानात उपस्थित तरुण भाविकांनी जोरजोरात भानोबाचा जयघोष करून त्यांना संजीवनी दिली.

 

टॅग्स :Puneपुणे