शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

‘सीव्हीजिल’ने ओलांडला एक हजार तक्रारींचा टप्पा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 12:07 IST

पुणे, बारामती, मावळ व शिरूर या चारही लोकसभा मतदारसंघांतून रविवारी दुपारी ४ वाजेपर्यंत १,००४ तक्रारी सी-व्हिजिल अ‍ॅपद्वारे तक्रारी केल्या आहेत.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालय : ८४७ निकाली, तर १५७ तक्रारी केल्या रद्दसी-व्हिजिल वर प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र कक्ष कार्यान्वित अ‍ॅपवर माहिती देणाऱ्याचे नाव आणि मोबाइल क्रमांक गुप्त संबंधित पथकाची १५ मिनिटांमध्ये घटनास्थळी पोहचून तक्रारीवर पुढील ३० मिनिटात कारवाई

पुणे : लोकसभा निवडणुकीमध्ये नागरिकांना सुध्दा आचारसंहिता भंगाच्या घटनांची माहिती जिल्हा प्रशासनाकडे देता यावी. या उद्देशाने निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेल्या सी-व्हीजिल अ‍ॅपच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांनी आचारसंहिता भंगाच्या एक हजारापेक्षा जास्त तक्रारी केल्या आहेत. त्यातील ८४७ तक्रारी निवडणूक अधिकाऱ्यांकडून निकाली काढल्या असून १५७ तक्रारी अयोग्य असल्याने रद्द केल्या आहेत.पुणे, बारामती, मावळ व शिरूर या चारही लोकसभा मतदारसंघांतून रविवारी दुपारी ४ वाजेपर्यंत १,००४ तक्रारी सी-व्हिजिल अ‍ॅपद्वारे  तक्रारी केल्या आहेत. मार्च महिन्याच्या १० तारखेपासून आचारसंहिता सुरू झाल्यापासून नागरिकांकडून तक्रारी येण्यास सुरूवात झाली. तक्रार प्राप्त झाल्यासून १०० मिनिटांत तक्रार निकाली काढण्याचे बंधन आहे. त्यामुळे राजकीय पक्षांबरोबरच सर्व सामान्य नागरिकांकडूनही या अ‍ॅपवर तक्रारी केल्या जात आहेत. लोकसभा निवडणूक अधिक पारदर्शक व शांततेतामय वातावरणात व्हावी यासाठी नागरिकांनी सी-व्हिजिल अ‍ॅपचा लाभ घ्यावा, असे आवाहन निवडणूक आयोगातर्फे केले होते. जिल्ह्यातील मतदारांनी अ‍ॅपचा अधिकाधिक वापर केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात तळमजल्यावर सी-व्हिजिल वर प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र कक्ष कार्यान्वित केला आहे. निवडणूक काळात कोणताही गैरप्रकार होत असल्यास नागरिकांना दोन मिनिटांचा व्हिडिओ अपलोड व छायाचित्र अपलोड करण्याची सुविधा आहे. अ‍ॅपवर माहिती देणाऱ्याचे नाव आणि मोबाइल क्रमांक गुप्त ठेवला जातो. नागरिकांनी केलेली तक्रार नोंदविल्यानंतर पाच मिनिटांमध्ये ही तक्रार जिल्हा नियंत्रण कक्षाकडे दाखल होते. कक्षाकडून तक्रारीची माहिती भरारी पथकाकडे पाठवविली जाते. त्यानंतर संबंधित पथक १५ मिनिटांमध्ये घटनास्थळी पोहचून तक्रारीवर पुढील ३० मिनिटात कारवाई केली जाते. सर्वाधिक तक्रारी अनधिकृत प्रचारफलक, बोर्ड, फ्लेक्स, होर्डिंग यांच्या आहेत. तसेच वृत्तवाहिन्यावर राजकीय पक्षांच्या नेत्यांनी केलेल्या भाषणाचे व्हिडिओ सुद्धा तक्रार म्हणून प्राप्त होत आहेत.  

टॅग्स :PuneपुणेElectionनिवडणूकLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPoliticsराजकारण