शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

म्हाडाच्या घरांसाठी सव्वाचार हजार अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 05:41 IST

केंद्र सरकारने २०२२पर्यंत सर्वांसाठी घरे देण्याची योजना आखली आहे.

पुणे : म्हाडाने विविध उत्पन्न गटांतील नागरिकांसाठी पुणे व पिंपरी-चिंचवड येथील ३ हजार १३९ सदनिका आणि २९ भूखंडांच्या विक्रीसाठी जाहीर केलेल्या लॉटरी योजनेसाठी बुधवार (दि. २३)अखेरीस ४ हजार २५८ जणांनी नोंदणी केली. म्हाडा पुणे विभागाचे सभापती समरजितसिंग घाटगे यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली.म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे या वेळी उपस्थित होते. केंद्र सरकारने २०२२पर्यंत सर्वांसाठी घरे देण्याची योजना आखली आहे. या पार्श्वभूमीवर, हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. म्हाडा पुणे विभागातर्फे अत्यल्प, अल्प, मध्यम व उच्च उत्पन्न गटांतील नागरिकांसाठी या घरांची सोडत जाहीर केली आहे. त्यासाठी लॉटरी डॉट म्हाडा डॉट जीओव्ही या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. नागरिकांना १९ जून २०१८ पर्यंत आॅनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार असून, २० जूनपर्यंत पैसे भरता येतील. या घरांची सोडत ३० जूनला होणार आहे.म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी काकडे म्हणाले, ‘‘यापूर्वी म्हाडाने डिसेंबर २०१६मध्ये २ हजार ५०० घरांची सोडत जाहीर केली होती. त्याचे वाटपही करण्यात आले आहे. म्हाडाची सोडतही पूर्णपणे आॅनलाईन आहे. नोंदणी करणे, सोडत जाहीर करणे आणि प्रतीक्षा यादी करणे आदी प्रक्रिया पूर्णपणे आॅनलाईन पद्धतीनेच पार पडणार आहे. घराच्या बांधकाम क्षमतेची ५० वर्षे हमी आम्ही देतो. भूकंपरोधक बांधकाम आणि आधुनिक सुविधा ही प्रकल्पाची वैशिष्ट्ये आहेत.’’या ठिकाणी घरे उपलब्ध परिसराचे नाव घरांची संख्यानांदेड सिटी १०८०रावेत, पुनावळे १२०वाकड २२चहोली, वडमुखवाडी २१४मोशी २३९येवलेवाडी ८०कात्रज २९धानोरी ५१

टॅग्स :mhadaम्हाडाHomeघर