शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

‘त्या’ एड्सग्रस्तांना मिळतेय नवसंजीवनी; राज्य एड्स नियंत्रण संस्थेची मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 02:44 IST

राज्यातील तीन वर्षांतील एचआयव्ही बाधित रुग्णांची संख्या जवळपास सहा हजार इतकी आहे.

- प्रीती जाधव-ओझा पुणे : काही एड्सग्रस्त रुग्ण उपचार अर्धवट सोडून देतात किंवा उपचारच घेत नाहीत. अशा रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर पुन्हा उपचार सुरू करण्यासाठी राज्य एड्स नियंत्रण संस्थेने मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत संबंधित रुग्णांचे समुपदेशन करून नियमित उपचार सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यात २०१७-१८ मध्ये आतापर्यंत ३८८ रुग्णांची रुग्णालयात नोंदणी झाली, पण त्यांच्यावर उपचार करता आले नाहीत. या मोहिमेत या रुग्णांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.राज्यातील तीन वर्षांतील एचआयव्ही बाधित रुग्णांची संख्या जवळपास सहा हजार इतकी आहे. मात्र, अनेक रुग्ण जिल्ह्यातील अ‍ॅन्टी रेट्रोव्हायरल (एआरटी) केंद्रात नाव नोंदवून नंतर पुन्हा केंद्राकडे फिरकत नाहीत. या मोहिमेंतर्गत जे एचआयव्हीग्रस्त रुग्ण उपचारासाठी ए.आर.टी. केंद्रात गेले नाहीत, केंद्रात नावनोंदणी करून पुन्हा आले नाहीत किंवा औषधे घेणे मध्येच सोडून दिले आहे, अशा रुग्णांचा शोध घेतला जाणार आहे. रुग्णांचे संपर्क क्रमांक, पत्ते शोधणे, गृहभेटीद्वारे रुग्णांपर्यंत पोहचणार आहेत.सीडीफोर तपासणीची अट रद्दएखाद्या रुग्णाला एचआयव्ही असल्याचे निदान झाल्यानंतरही जर त्याचा सीडीफोर काउंट (शरीरातील पांढऱ्या पेशींचे प्रमाण) पाचशे किंवा त्यापेक्षा कमी असल्यावरच त्यावर उपचार सुरू केले जात होते. या अटीमुळे अनेक रुग्ण उपचारापासून वंचित राहात असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ही अट आता रद्द करण्यात आली आहे.क्लस्टर अ‍ॅक्टिव्हिटीजिल्ह्यात एचआयव्ही रुग्णांची संख्या पाहता जिल्हास्तरावर ब्लॉक वाईज आराखडा तयार करण्यात आला आहे. आराखडा तयार करून अतिजोखमीच्या ठिकाणी जनजागृती तसेच समुपदेशन व तपासणी करण्यात येत आहे.सदर क्लस्टर अ‍ॅक्टिव्हिटी पुणे महापालिका तसेच पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात आयसीटीसी, एनजीओ व आरोग्य क्षेत्रातील संस्थांमार्फत राबविली जात आहे व त्यातून सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचे जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण विभागाकडून सांगण्यात आले आहे.या मोहिमेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी वेळ पडल्यास या क्षेत्रात काम करणाºया स्वयंसेवी संस्थांची मदत घेणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्यामुळे ‘विहान’सारख्या या क्षेत्रात विशेष काम करणाºया स्वयंसेवी संस्था या मोहिमेत पुढाकार घेत आहेत.मोहिमेमध्ये २०१४-१५ ते जून २०१८ पर्यंत उपचारापासून लांब राहिलेल्या रुग्णांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी सामाजिक संस्थांचीही मदत घेतली जात आहे. आयसीटीसी व विहानमार्फत या रुग्णांना एआरटी केंद्राकडे संदर्भित करण्यात येत आहे.-डॉ. ए. बी. नांदापूरकर,जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय औंध, पुणेउपचार सुरूच न केलेलेकिंवा बंद केलेल्या एड्सग्रस्त रुग्णांचे समुपदेशन करून त्यांना या उपचाराचे महत्त्व पटवून दिले जात आहे. त्यामुळे ही मोहीम महत्त्वपूर्ण असून, चांगले यश मिळत आहे.- बालाजी टिंगरे, जिल्हा पर्यवेक्षक,जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागपुणे जिल्ह्यात एचआयव्ही रुग्णांची संख्या पाहता जिल्हास्तरावर ब्लॉक वाईज आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यात २०१७-१८ मध्ये उपचारापासून लांब राहिलेल्या रुग्णांमध्ये ३८८ रुग्णांचा समावेश आहे. त्या सर्वांची इत्थंभूत माहिती संबंधित आयसीटीसी केंद्राकडे उपलब्ध असून त्यानुसार त्यांचा शोध तेथील स्थानिक पातळीवर घेतला जात आहे. त्यातून जून व जुलै महिन्यात एकूण १६३ रुग्णांचा शोध लागला आहे.

टॅग्स :Healthआरोग्यMedicalवैद्यकीय