शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बारामती नगरपरिषद हद्दीतील 'या' गावात लोकप्रतिनिधी दाखवा अन् १ हजार रुपये बक्षीस मिळवा; 'रासप’ची ऑफर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 18:27 IST

मॅरेथॉनपटू लता करे यांचे पती चिंचेच्या झाडाखाली दोन दिवस पडुन होते; रासपचा खळबळजनक आरोप...

बारामती: बारामती नगरपरिषद परिसरात गेल्या एक वर्षांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. प्रत्येक ठिकाणी जो तो लोकप्रतिनिधी काम करताना दिसत आहे. मात्र, जळोची या गावात एखादा वगळता बाकी स्थानिक लोकप्रतिनिधी यांचे दर्शन जवळपास दुर्मिळच झाले आहे.त्यामुळे गावात लोकप्रतिनिधी दाखवा आणि १ हजार रुपये मिळवा,असे आव्हान राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तालुकाध्यक्ष अ‍ॅड. अमोल सातकर यांनी दिले आहे.

या लोकप्रतिनिधींची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे रासपच्या वतीने सांगण्यात आले. जळोची परिसरात कोरोनाचे संकट असताना लोकप्रतिनिधी अगदी गावात येतच नाही, असे म्हटले तरी चालेल. गावातील कोणाच्या काय अडचणी आहेत, कोणाला बेड मिळत नाही, कोणाला औषध नाही. गेल्या कित्येक दिवसापासुन जळोची प्राथमिक शाळेत कोविड सेंटर, लसीकरण केंद्र सूूरु करा ही मागणी आहे. तसेच गावात औषध फवारणी करा ही मागणी आहे. परंतु लोकप्रतिनिधी साधे बोलायला तयार नाहीत.गावाचा सोशल  मीडिया ग्रुप आहे. तिथे लोकप्रतिनिधी गावाच्या या विषयावर बोलायला तयार नाहीत, लोकप्रतिनिधी स्वत:चे अर्थकारण करण्यात,वाढदिवसाचे मेसेज करण्यात व्यस्त असल्याचा आरोप सातकर यांनी केला आहे.———————————————   ...करे यांचे पती चिंचेच्या झाडाखाली दोन दिवस पडुन होते....बारामती येथील ७२ वर्षीय मॅरेथॉनपटु लता करे यांचे पती भगवान करे यांचे मंगळवारी(दि ४ मे) कोरोनाने निधन झाले.मात्र,त्यानंतर ७ दिवसांनी भगवान करे यांच्याबाबत राष्ट्रीय समाज पक्षाच्या तालुकाध्यक्षांनी धक्कादायक माहिती पुढे आणली आहे. त्यानुसार  भगवान करे हे हॉस्पीटल मधुन उपचार घेत असताना निघुन आले होते. दोन दिवस जळोची गावातील चिंचे च्या झाडा खाली पडून होते, तरी देखील नगरपरिषदेच्या लोकप्रतिनिधी यांचे गावाकडे लक्ष गेले नसल्याचा आरोप राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तालुकाध्यक्ष अ‍ॅड अमोल सातकर यांनी केला आहे.——————————————

टॅग्स :Baramatiबारामतीcorona virusकोरोना वायरस बातम्याAjit Pawarअजित पवारPoliticsराजकारण