शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

थर्टी फर्स्टला येऊरमध्ये डीजे पार्ट्यांवर बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 04:31 IST

ठाण्यातील पर्यटनस्थळ असलेल्या येऊर येथील २५८ बंगलेधारकांसह सात हॉटेलमालकांना ठाणे शहर पोलिसांनी थर्टी फर्स्टला होणाऱ्या पार्ट्यांच्या पार्श्वभूमीवर नोटिसा बजावल्या आहेत.

ठाणे  - ठाण्यातील पर्यटनस्थळ असलेल्या येऊर येथील २५८ बंगलेधारकांसह सात हॉटेलमालकांना ठाणे शहर पोलिसांनी थर्टी फर्स्टला होणाऱ्या पार्ट्यांच्या पार्श्वभूमीवर नोटिसा बजावल्या आहेत. या भागात मद्यविक्री आणि डीजे पार्ट्यांवरही बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर मद्यपान करून सुसाट गाड्या पळवणाºयांवरही विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. त्यासाठी येऊर आणि उपवन येथे नाकाबंदी केली जाणार असून, भरारी पथकेही तैनात करण्यात येणार आहेत. या पार्ट्यांमध्ये गैरप्रकार घडल्यास संबंधित बंगलेधारक आणि आयोजकांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.नववर्ष स्वागताचे निमित्त करून ‘तळीराम’ दरवर्षी याठिकाणी पार्ट्यांसाठी आपला मोर्चा वळवतात. दारू पीत मोठ्या आवाजात बंगल्यामध्ये, हॉटेलच्या आवारात डीजे, स्पीकरवर गाणी लावून थर्टी फर्स्ट सेलिब्रेट करण्याचा ट्रेण्ड अनेक वर्षांपासून कायम आहे. यावर्षी मात्र प्रशासनाने डीजे, मद्यपानाला बंदी केली आहे. येथील २५८ बंगलेधारकांसह सात हॉटेलमालकांना वर्तकनगर पोलिसांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ कलम ६८ अन्वये नोटिसा बजावल्या आहेत. यावेळी बंगले भाड्याने देताना काळजी घ्यावी, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे. बंगल्यांमध्ये झालेल्या पार्ट्यांमध्ये गैरप्रकार घडल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा या नोटिशींद्वारे देण्यात आला आहे.बंगलेधारकांवरही करणार कारवाईयेऊर परिसर हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग आहे. या परिसरात वन्यप्राण्यांचा वावर असल्याने हा परिसर सायलेन्स झोन (शांतता क्षेत्र) म्हणून घोषित केला आहे. तलावामुळे उपवनही पार्ट्यांसाठी ठाणेकरांच्या पसंतीचे ठिकाण बनले आहे. उपवन परिसरात केवळ थर्टी फर्स्टलाच नव्हे तर वर्षभर पार्ट्या रंगत असतात.डीजे आणि स्पीकर, तसेच दारू किंवा अमली पदार्थांच्या पार्ट्यांना बंदी घातली आहे. या पार्ट्यांमध्ये गैरप्रकार झाल्यास बंगलेधारकांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. येऊर येथील २५८ बंगलेधारकांसह सात हॉटेलमालकांना नोटिसा बजावल्या आहेत. धूमस्टाइलने दुचाकी चालवणाºयांसह मद्यपी वाहकांवरही लक्ष ठेवण्यात येणार आहे. थर्टी फर्स्टसाठी दोन्ही परिसरांत नाकाबंदी आणि चौकाचौकांत बंदोबस्त लावण्यात येणार असून भरारी पथकही तयार केले आहे. - प्रदीप गिरधर,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वर्तकनगर

टॅग्स :thaneठाणे